भारताला नामिबियाचे आव्हान

By Admin | Updated: February 3, 2016 03:08 IST2016-02-03T03:08:08+5:302016-02-03T03:08:08+5:30

अंडर-१९ वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्यपूर्व फेरीची लढत ६ फेब्रुवारीला नामिबियाशी होणार आहे. भारतीय संघाने ग्रुप डी मध्ये आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले आहे.

Namibia Challenge to India | भारताला नामिबियाचे आव्हान

भारताला नामिबियाचे आव्हान

ढाका : अंडर-१९ वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्यपूर्व फेरीची लढत ६ फेब्रुवारीला नामिबियाशी होणार आहे.
भारतीय संघाने ग्रुप डी मध्ये आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले आहे. भारताने आयर्लंडला ७९ धावांनी, न्यूझीलंडला १२0 धावांनी आणि नेपाळला सात विकेटनी हरविले होते. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर ग्रुप ए मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ नामिबियाचे आव्हान असणार आहे. नामिबियाची या स्पर्धेतील कामगिरी चांगली होत असून, त्यांनी गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेला साखळी फेरीत हरवून मोठा उलटफेर घडविला होता.त्यांनी स्कॉटलंडलाही ९ विकेटनी हरविले होते. बांगलादेशकडून मात्र ते पराभूत झाले होते. यजमान बांगलादेश ५ फेब्रुवारीला नेपाळशी भिडणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Namibia Challenge to India