नदाल-मरे भिडणार उपांत्य फेरीत
By Admin | Updated: June 6, 2014 09:20 IST2014-06-06T00:49:47+5:302014-06-06T09:20:38+5:30
स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी डेव्हिड फेररचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नदाल-मरे भिडणार उपांत्य फेरीत
>फ्रेंच ओपन टेनिस : डेव्हिड फेरर, गेल मोंफिल्स पराभूत
पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला आणि विक्रमी 8 वेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी डेव्हिड फेररचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नदालला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अव्वल मानांकित नदालने पाचव्या मानांकित फेररची झुंज 4-6, 6-4, 6-क्, 6-1 ने मोडून काढली. मरेने 23व्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सविरुद्ध निर्णायक सेटर्पयत रंगतदार ठरलेल्या लढतीत 6-4, 6-1, 4-6, 1-6, 6-क् ने सरशी साधली. मोंफिल्सच्या पराभवामुळे फ्रान्सचे फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे स्वप्न भंगले. नदाल आणि फेरर यांच्यादरम्यान उपांत्यपूर्व फेरीची लढत गेल्या
वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती ठरली. पहिल्या सेटमध्ये 6-4ने
सरशी साधल्यानंतर फेररला रॉबिन सॉडरलिंगच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी असल्याचे वाटत होते. सोडरलिंग रोला गॅरोजमध्ये नदालला पराभूत करणारा एकमेव टेनिसपटू आहे. पहिला सेट गमाविणा:या नदालने त्यानंतर मात्र चमकदार कामगिरी करीत वर्चस्व गाजविले. फ्रेंच ओपनचा बादशहा असलेला नदालने त्यानंतर तिन्ही सेट जिंंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. फ्रेंच ओपनमध्ये नदालची कामगिरी 64-1 अशी आहे.
(वृत्तसंस्था)