एन.श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
By Admin | Updated: June 26, 2014 18:55 IST2014-06-26T11:41:46+5:302014-06-26T18:55:55+5:30
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलचे (आयसीसी) नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे

एन.श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.२६ - बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलचे (आयसीसी) नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. श्रीनिवासन लौकरच अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. त्यानुसार श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले. मात्र आता त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.