मविप्रऑलिम्पिक डे रन सोमवारी

By Admin | Updated: June 20, 2014 21:48 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:48:08+5:30

नाशिक : जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने २३ जूनला ऑलिम्पिक डे रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील व सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य बी़ जी़ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली़

MVPR Olympics Day Run on Monday | मविप्रऑलिम्पिक डे रन सोमवारी

मविप्रऑलिम्पिक डे रन सोमवारी

नाशिक : जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने २३ जूनला ऑलिम्पिक डे रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील व सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य बी़ जी़ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली़
पाटील यांनी सांगितले, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात करणारे फ्रेंच तत्त्वज्ञ बॅरन पिअर दि कुबर्टीन यांच्या योगदानाबद्दल २३ जूनला सर्वत्र जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो़ २३ जूनला सकाळी सात वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मॅरेथॉन चौकातून या ऑलिम्पिक रनला प्रारंभ होणार आहे़ या रनला मविप्र संस्थेतील उत्कृष्ट खेळाडू हिरवा झेंडा दाखवणार आहेत़ तत्पूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या धावपटूच्या पुतळयाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात येणार आहे़ यामध्ये एक किलोमीटर रन असणार आहे़ मविप्र मॅरेथॉन चौकापासून यास प्रारंभ होत असून, व्ही़ एऩ नाईक सर्कल ते परत मॅरेथॉन चौक असा हा मार्ग असणार आहे़
पत्रकार परिषदेला मविप्रचे शिक्षणाधिकारी एस़ के ़ शिंदे, जनसंपर्क अधिकारी सी़ डी़ शिंदे, आऱ के .दातीर, मीनाक्षी गवळी आदि उपस्थित होते़
फ ोटो क्र ़ 20 पीएचजेएन
फ ोटो ओळी - मविप्र ऑलिम्पिक डे रनच्या भित्तीचित्राचे अनावरण करताना मविप्रचे शिक्षणाधिकारी एस़ के ़ शिंदे, जनसंपर्क अधिकारी सी़ डी़ शिंदे, क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, डॉ़ बी़ जी़ वाघ, आऱ के .दातीर, मीनाक्षी गवळी आदि़

Web Title: MVPR Olympics Day Run on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.