शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफा कमाल यांचा राजीनामा

By admin | Updated: April 2, 2015 01:41 IST

विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल

ढाका : विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोबतच आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे व्यक्तिमत्त्व’ संबोधले.शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरगच्च पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी आयसीसीकडे राजीनामा पाठवीत आहे. संविधानाच्या चौकटीत मला काम करणे कठीण होत आहे. घटनाबाह्य काम मी करू शकत नाही.’’ बांगला देश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले कमाल यांनी श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे आणि वादग्रस्त’ व्यक्तिमत्त्व संबोधले. आयसीसी आता इंडियन क्रिकेट कौन्सिल’ बनल्याची टीकादेखील केली.श्रीनिवासन यांचे नाव न उच्चारताच कमाल म्हणाले, ‘‘मला त्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. अशी व्यक्ती क्रिकेटची प्रमुख असेल तर क्रिकेट चालेल कसे? अशा लोकांना क्रिकेटपासून दूर ठेवायला हवे. ही व्यक्ती क्रिकेट घाणेरडे करीत आहे. मी राजीनामा का दिला याचा विचार आता आयसीसीने करावा.’’मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होतो. ट्रॉफी देण्याचा अधिकार माझ्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत बांगला देशच्या पराभवास खराब अम्पायरिंग जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आयसीसीला त्यांचे आरोप फेटाळण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.कमाल यांच्या आरोपांमुळे श्रीनिवासन नाराज होते. त्यांनी सार्वजनिकरीत्या भाष्य न करता आयसीसी बोर्डापुढे तीव्र नापसंती दर्शविली होती. दुसरीकडे कमाल यांनी दावा केला, ‘मला माझे आरोप परत घेण्यास सांगण्यात आले. मी १८ कोटी जनतेचा अनादर होईल, असे सांगून आरोप परत घेण्यास नकार दिला. माफी मागितली नाही तर ट्रॉफी प्रदान करता येणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. विश्वचषकात ट्रॉफी प्रदान करण्याचा मान अध्यक्षाला देणारा नियम जानेवारी २०१५ ला संशोधित करण्यात आला आहे.’कमाल म्हणाले, ‘‘मी कुठल्याही देशाविरुद्ध बोललो नाही. मात्र खरे बोललो याची शिक्षा ट्रॉफी देण्याचा अधिकार काढून देण्यात आली. पंचांनी काही निर्णय हेतुपुरस्सर दिले होते किंवा नाही याची आयसीसीने सविस्तर चर्चा करावी, अशी मी मागणी केली आहे. मात्र आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी माझे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगितले.’’ मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी गाठले तेव्हा आपण राजीनामा देणार का, असा सवाल विचारण्यात आला. यावर कमाल यांनी मी तेच करीत असल्याचे सूचक वक्तव्य केले.(वृत्तसंस्था)