शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुंबईचे पहेलवान ‘भारी’ तर पुण्याचे ‘लई भारी’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 5:44 PM

राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा: दोन दिवसीय कुस्तीच्या दंगलीत पुण्याचाच डंका

हरिदास ढोक, देवळी (वर्धा): महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. त्यात पुणे जिल्ह्याचाच बोलबाला राहिला असून इतर जिल्ह्याच्या पहेलवानांना छोबीपछाड देत स्पर्धेवर मोहर उमटविली. त्या पाठोपाठ मुंबईतील पहेलवानांनी कडवी झुंज देत उपविजेतेपदाचा मान पटकाविला.देवळी येथील नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर मागील चार दिवसांपासून महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचा महासंग्राम रंगला आहे. सुरुवातीला दोन दिवस पुरुषांची कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यानंतर मंगळवार व बुधवारी महिलांची २१ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चांगलीच रंगली. दोन दिवस चालेल्या या महिला कुस्त्यांच्या सामन्यामध्ये विविध वजन गटात स्पर्धा झाली. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, लातूर, अहमदनगर, बीड, धुळे, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील पहेलवानांनी कुस्तीचा फड गाजवून पारितोषीक पटकाविले. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

विदर्भातील पाच महिला मल्लांनी मारली बाजी २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विदर्भातील महिला पहेलवानांनीही सहभाग घेतला होता. विदर्भातील मल्लांनीही आपल्या खेळाची चुणूक दाखवून विदर्भाचा ठसा उमटविला. या स्पर्धेत नागपूरच्या प्रिया घरजाळे हिने ५५ किलो वजन गटात तर अमरावतीच्या श्वेता सवई हिने ५७ किलो, भारती आमघरे हिने ६५ किलो व खुशबू चौधरीने ६८ किलो वजन गटात आपले वर्चस्व कायम राखले आहे.

वजन गटानुसार विजेत्या महिला पहेलवान५० वजन गटकाजल जाधव  सोलापूरकिर्ती गुडलेकर  धुळेनिकिता गायकवाड ठाणेप्रगती ठोंबरे बीड

५३ वजन गटदिक्षा कराडे कोल्हापूरअक्षता वाळूज  पिंपरी चिंचवडकोमल देसाई ठाणेसोनम सरकार  सोलापूर

५५ वजन गटप्रिया घरजाळे नागपूररुपाली वरदे औरंगाबादप्रतिक्षा मुडे बीडश्रद्धा भोर पुणे

५७ वजन गटसोनाली तोडकर बीडप्रितम दाभाडे पुणेश्वेता सवई अमरावतीलक्ष्मी पवार  लातूर

५९ वजन गटविश्रांती पाटील कोल्हापूरकाजल ढाकने अहमदनगरप्रतिक्षा नायकवाडे सोलापूरदुपाली सोनी पिंपरी चिंचवड

६२ वजन गटअंकिता गुंड पुणेभाग्यश्री भोईर कल्याणऋृतिका मानकर मुंबईसरोज पवार ठाणे

६५ वजन गटमनाली जाधव ठाणेभारती आमघरे अमरावतीजस्तिन शेख नाशिकजैमिया बागवान  लातूर

६८ वजन गटहर्षदा जाधव पुणेखुशबू चौधरी अमरावतीशिवाणी पाटील मुंबईतेजल सोनवने पुणे

७२ वजन गटकोमल गोळे  पुणेऋतुजा सपकाळ  कोल्हापूरप्रियंका दुबुले सांगलीवैष्णवी पायगुंडे सातारा

७६ वजन गटमनिषा दिवेकरस्वाती पाटील मुंबईवर्षाराणी पाटील मुंबईभाग्यश्री गडकर कल्याण

टॅग्स :Wrestlingकुस्तीMumbaiमुंबईPuneपुणे