शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रणजीमध्ये मुंबईच ‘ठाकूर’

By admin | Updated: February 27, 2016 05:10 IST

शार्दूल ठाकूर (३ व ५ बळी), धवल कुलकर्णी (५ व २ बळी) यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी

पुणे : शार्दूल ठाकूर (३ व ५ बळी), धवल कुलकर्णी (५ व २ बळी) यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी व सिद्धांत ठाकूरच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला १ डाव व २१ धावांनी नमवित ४१व्यांदा रणजी चषकावर मोहर उमटविली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर हा सामना झाला. सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या २३५ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईने पहिल्या डावात ३७१ धावांची खेळी केली. पहिल्या डावात १३६ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्राचा दुसरा डाव ११५ धावांत गुंडाळत एक डाव २१ धावांनी शानदार विजय मिळविला. शार्दूल ठाकूरने २६ धावांत ५ गडी तंबूत धाडत सौराष्ट्राची फलंदाजी मोडून काढली. धवल कुलकर्णीने ३४ धावांत २, बलविंदरसिंग संधूने २१ धावांत २, तर नायरने २६ धावांत १ बळी घेत सौराष्ट्राचा डाव गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक २७ धावा केल्या. तत्पूर्वी मुंबईने कालच्या ८ बाद २६२ धावांवरून शुक्रवारी खेळण्यास सुरुवात केली. सिद्धेश लाडने कालच्या २२ धावांवरून खेळताना त्यात ८८ धावांची भर घातली. त्याने १०१ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने आपली खेळी साजरी केली. तर बलविंदर संधूने ६ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ३४ धावा फटकाविल्या. लाड व संधू या जोडीने शेवटच्या गड्यासाठी केलेली १०३ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. त्यांच्या खेळीमुळेच मुंबईने तिसऱ्या दिवशीच सामन्याचा निकाल लावला. (प्रतिनिधी)धावफलक : सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्व बाद २३५, (अर्पित वासवदा ७७, प्रेरक मंकड ६६. धवल कुलकर्णी ५/४२, शार्दूल ठाकूर ३/८९). मुंबई पहिला डाव : ८२.२ षटकांत सर्वबाद ३७१, (श्रेयस अय्यर ११७, सूर्यकुमार यादव ४८, सिद्धेश लाड ८८. जयदेव उनादकट ४/११८, हार्दिक राठोड ३/७३). सौराष्ट्र दुसरा डाव : ४८.२ षटकांत सर्व बाद ११५ (चेतेश्वर पुजारा २७, शेल्डन जॉक्सन १३. धवल कुलकर्णी २/३४, बलविंदर संधू २/२१, शार्दूल ठाकूर ५/२६).०२कोटींचाबोनसआदित्य तारेच्या नेतृत्त्वाखालील रणजीविजेत्या मुंबई संघाला मुुंबई क्रिकेट असोशिएशनने दोन कोटी रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदनही केले आहे.