शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

मुंबईला चेन्नईच्या ‘स्मॅश’चा दणका

By admin | Updated: January 4, 2016 03:03 IST

‘ट्रम्प’ लढतीत निर्णायक बाजी मारताना सिमॉन सँटोसने यजमान मुंबई रॉकेट्स विरुद्ध चेन्नई स्मॅशर्सला विजयी केले. यासह चेन्नईने प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये

मुंबई : ‘ट्रम्प’ लढतीत निर्णायक बाजी मारताना सिमॉन सँटोसने यजमान मुंबई रॉकेट्स विरुद्ध चेन्नई स्मॅशर्सला विजयी केले. यासह चेन्नईने प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) विजयी सलामी दिली. पिछाडीनंतर अखेरच्या ट्रम्प लढतीत सिमॉनने मुंबईच्या गुरुसाईदत्तला नमवून चेन्नईला ४-३ असे विजयी केले. तत्पूर्वी हैदराबाद हंटर्सने चुरशीच्या सामन्यात बंगळुरु टॉपगन्सला ३-२ असा धक्का दिला.वरळीच्या नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे झालेल्या सामन्यात यजमान मुंबईला दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. पहिल्याच लढतीत चेन्नईच्या ख्रिस अ‍ॅडकॉक - पिआ झेबादिह यांनी कामिला जुहल - व्लादिमीर इवानोव्ह यांना १५-१०, ७-१५, १५-११ असे नमवून चेन्नईला १-० आघाडीवर नेले. पुरुष एकेरीत मुंबईच्या एचएस प्रणयने ब्राईस लेवेरडेझचा १५-८, १५-११ असा पाडाव करुन १-१ बरोबरी साधली.यानंतर ट्रम्प लढतीत मॅथिअस बोए - व्लादिमीर या जोडीने बाजी मारत अ‍ॅडकॉक - प्रणव चोप्रा यांना १५-१०, ९-१५, १५-१३ असे पराभूत करुन मुंबईला ३-१ अशा मजबूत आघाडीवर नेले. तर बलाढ्य पीव्ही सिंधूने महिला एकेरीत ली हानचे आव्हान १५-८, ११-१५, १५-८ असे परतावून चेन्नईची पिछाडी २-३ अशी कमी केली. यामुळे निर्णायक ठरलेल्या अखेरच्या पुरुष एकेरीत चेन्नईने बाजी मारली.नेमकी ही लढत ट्रम्प असल्याने चेन्नईच्या सिमॉनने तुफान स्मॅशेस करुन गुरुसाईदत्तला १५-९, १५-१२ असे नमवत संघाला विजयी केले. याआधी स्टार खेळाडू ली चाँग वेई पराभूत झाल्यानंतरही हैदराबादने बाजी मारली. पुरुष दुहेरीची ट्रम्प लढत निर्णायक ठरवताना हैदराबादने विजय मिळवला. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चाँग वेई विरुध्द अपयशी ठरलेल्या के. श्रीकांतने त्याला नमवण्याची कामगिरी केली. सुओ डी हिने सलामीच्या लढतीत बंगळुरुला विजयी केल्यानंतर हैदराबादने पुरुष दुहेरीच्या ट्रम्प लढतीत बाजी मारुन २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर पी. कश्यपने समीर वर्माचा २-० असा धुव्वा उडवला. ही लढत बंगळुरुची ट्रम्प असल्याने त्यांना फटका बसला आणि हैदराबादने ३-० अशी आघाडी घेतली. यानंतरच्या मिश्र दुहेरी व पुरुष एकेरीत बंगळुरुने विजय मिळवला खरा पण तोपर्यंत उशीर झालेला. (क्रीडा प्रतिनिधी)