शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्ले आॅफ’मधील मुंबईचे आव्हान जिवंत

By admin | Updated: May 16, 2016 04:16 IST

भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने रविवारी येथे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८0 धावांनी धडाकेबाज विजय मिळवला

विशाखापट्टणम : कृणाल पंड्याची अष्टपैलू खेळी आणि जसप्रीत बुमराह याची भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने रविवारी येथे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८0 धावांनी धडाकेबाज विजय मिळवताना नवव्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कृणालने अवघ्या ३७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ प्रेक्षणीय षटकारांसह ८६ धावा केल्या. यादरम्यान त्याने मार्टिन गुप्टील (४२ चेंडूंत ४८) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ८.२ षटकांत ९८ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शार्मा (२१ चेंडूंत ३१) याने याआधी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. जोस बटलर (नाबाद १८) आणि अंबाती रायुडू (नाबाद १३) यांनी १३ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबईला ४ बाद २०६, अशी विशाल धावसंख्या उभारता आली.मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ सुरुवातीलाच दबावात आला आणि अखेर त्यांचा संघ १९.१ षटकांत १२६ धावांत गारद झाला. त्यांच्या तीन फलंदाजांनाच दुहेरी आकडी धावसंख्या गाठता आली. त्यात क्विंटन डिकॉकने सर्वाधिक ४० धावा केल्या; परंतु तो पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिकार बनला. बुमराहने १३ धावांत ३ गडी बाद केले, तर पंड्याने गोलंदाजीतही कमाल करताना १५ धावांत २ बळी घेतले.मुंबईसाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असा होता; परंतु आज मोठ्या विजयाने त्यांच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या. मुंबईचे आता १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत आणि तो गुण तालिकेत तिसऱ्या स्थानी आला, तर डेअरडेव्हिल्सचे आता ११ सामन्यांत १२ गुण झाले असून, तो पाचव्या स्थानी घसरला आहे. आता पुढच्या फेरीत जाण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याआधी, दिल्लीकरांनी नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. रोहितने पहिल्याच षटकात एक चौकार व एक षटकार ठोकून आपला इरादा स्पष्ट केला. रोहित - गुप्टील यांनी ४६ धावांची भागीदारी करताना संघाची भक्कम धावसंख्येकडे वाटचाल केली. मात्र, आक्रमणाच्या नादात रोहितने अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झेलबाद दिला. यानंतर गुप्टील व युवा कृणाल पंड्या यांनी दिल्लीकर गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, अनुभवी गुप्टीलच्या तुलनेत युवा कृणाल अधिक आक्रमक झाला. गुप्टीलनेही त्याला अधिकाधिक स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. गुप्टीलच्या नंतर फलंदाजीस येऊनही कृणालने त्याच्याआधी अर्धशतक झळकावले. गुप्टील ४२ चेंडंूत २ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या केरॉन पोलार्डनेही तुफानी हल्ला करणाऱ्या कृणालला अधिक स्ट्राईक दिली. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात कृणाल ख्रिस मॉरिसचा बळी ठरला. त्याने ७ चौकार व ६ षटकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर बटलर व अंबाती रायुडू यांनी आक्रमक फटकेबाजी करून संघाला दोनशेचा पल्ला पार करून दिला. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक मुंबई इंडियन्स : २0 षटकांत ४ बाद २0६. (कृणाल पंड्या ८६, मार्टिन गुप्टील ४८, रोहित शर्मा ३१, मॉरिस २/३४).दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.१ षटकांत सर्व बाद १२६. (क्विंटन डी कॉक ४0, ऋषभ पंत २३, मॉरीस २0, बुमराह ३/१३. कृणाल पंड्या २/१५)