शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या फिरकीपुढे मुंबईकरांची घसरगुंडी

By admin | Updated: November 24, 2015 02:23 IST

गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने बलाढ्य मुंबई रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध अडचणीत आला आहे.

इंदौर : गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने बलाढ्य मुंबई रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटातील सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध अडचणीत आला आहे. यजमान मध्य प्रदेशला २४० धावांत गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसअखेर मुंबईची ६ बाद ७४ अशी केविलवाणी अवस्था झाली. अजूनही मुंबईकर १६६ धावांनी पिछाडीवर आहेत. निखिल पाटील आणि इक्बाल अब्दुल्ला या नाबाद जोडीवर मुंबईची भिस्त टिकून आहे.होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मधल्या फळीतील हरप्रीत सिंगचा अपवाद वगळता त्यांचा इतर कुठलाही फलंदाज मुंबईच्या माऱ्यापुढे टिकू शकला नाही. मध्य प्रदेशला ७५.१ षटकांत २४० धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईच्या एकहाती वर्चस्वाची अपेक्षा होती. मात्र मुंबईकर फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे यजमानांनी पहिल्याच दिवशी नाट्यमयरीत्या सामन्यावर मजबूत पकड मिळवली.जलज सक्सेना आणि अंकित शर्मा या फिरकीपटूंनी मुंबईकरांना आपल्या तालावर नाचवताना प्रत्येकी ३ बळी घेतले. अखिल हेरवाडकर आणि जय बिस्त यांनी सावध सुरुवात केल्यानंतर ३९ धावांवर मुंबईला हेरवाडकरच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर अवघ्या ३० धावांत झटपट ५ फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा डाव केवळ २१ षटकांत ६ बाद ६९ धावा असा घसरला. निखिल पाटील आणि इक्बाल अब्दुल्ला या जोडीने दिवसअखेर टिकून राहताना मुंबईची आणखी पडझड रोखली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या मध्य प्रदेशला बसलेल्या झटपट धक्क्यानंतर हरप्रीतने झुंजार ५९ धावांची खेळी करून सावरले. त्याने १५५ चेंडूंत ५ चौकार लगावले. मध्य प्रदेश ४ बाद ६९ अशा अडचणीत असताना हरप्रीतने देवेंद्र बुंदेलासह निर्णायक ६२ धावांची भागीदारी केली. बुंदेला बाद झाल्यानंतर यजमानांचा डाव पुन्हा घसरला. नवव्या क्रमांकावरील ईश्वर पांड्येने आक्रमक ३५ धावा फटकावताना संघाला २०० चा टप्पा पार करून दिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईकर अंकुश जयस्वालने शानदार कामगिरी करताना ६३ धावांत ४ धक्के देत यजमानांना हादरवले. तर शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर त्रि. गो. अंकित शर्मा १७, जय बिस्त झे. श्रीवास्तव गो. सक्सेना २७, श्रेयश अय्यर झे. ओझा गो. सक्सेना १, सूर्यकुमार यादव पायचीत गो. सक्सेना २, आदित्य तरे झे. पाटीदार गो. शर्मा ०, सिद्धेश लाड त्रि. गो. शर्मा १३, निखिल पाटील खेळत आहे १०, इक्बाल अब्दुल्ला खेळत आहे ०. अवांतर - ४. एकूण : २१ षटकांत ६ बाद ७४ धावा.गोलंदाजी : जलज सक्सेना ११-२-३२-३; अंकित शर्मा १०-२-३९-३.आदित्य श्रीवास्तवा त्रि. गो. ठाकूर ७, जलज सक्सेना पायचीत गो. दाभोळकर १६, रजत पाटीदार झे. अय्यर गो. अब्दुल्ला २६, नमन ओझा झे. हेरवाडकर गो. जयस्वाल १५, हरप्रीत सिंग झे. तरे गो. जयस्वाल ५९, देवेंद्र बुंदेला त्रि. गो. ठाकूर १४, रमीझ खान झे. यादव गो. बिस्त २३, अंकित शर्मा झे. तरे गो. जयस्वाल ९, एस. जैन झे. अय्यर गो. जयस्वाल ०, इश्वर पांड्ये झे. यादव गो. दाभोळकर ३५, मिहिर हिरवाणी नाबाद १७. अवांतर - १९. एकूण : ७५.१ षटकांत सर्व बाद २४० धावा.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर १५-४-४२-२; विशाल दाभोळकर १९.१-३-५९-२; इक्बाल अब्दुल्ला १३-३-२९-१; अंकुश जयस्वाल १९-४-६३-४; सिद्धेश लाड ३-०-१२-०; जय बिस्त ६-१-१६-१.