शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर ईशप्रीत सिंगची बाजी

By admin | Updated: November 25, 2015 02:58 IST

महाराष्ट्र राज्य कुमार व वरिष्ठ बिलीयर्डस् व स्नूकर निवड चाचणी स्पर्धेच्या कुमार स्नूकर गटात मुंबईच्या ईशप्रीत सिंंग याने विजेतेपद पटकावले

पुणे : महाराष्ट्र राज्य कुमार व वरिष्ठ बिलीयर्डस् व स्नूकर निवड चाचणी स्पर्धेच्या कुमार स्नूकर गटात मुंबईच्या ईशप्रीत सिंंग याने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या अमोल अब्दागिरी व तहा खान यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान तर, साताऱ्याच्या अनिकेत तावरेने चौथे स्थान मिळवले. पीवायसी हिंंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलीयर्डस् आणि स्नूकर हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. ईशप्रीत सिंंगने अमोल अब्दागिरी, तहा खान आणि अनिकेत तावरे या तिघांना सहजपणे नमवून अव्वल क्रमांक मिळवला. दुसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत अमोल अब्दागिरीने तहा खानला ५८-३८, ६०-२३, ८-१०२ (७४), ५६-३९ असे पराभूत केले. अनिकेत तावरे आणि अमोल अब्दागिरीच्या निर्णायक सामन्यात अनिकेतने ५५-४०, ५०-२१, ३०-६२, ४८-५१, ५०-४३ अशी बाजी मारली. मात्र अमोलचा फ्रेम गुणांक अनिकेतपेक्षा सरस असल्याने अमोलला द्वितीय स्थान मिळाले. राष्ट्रीय महिला खेळाडू उषा खंडेलवाल यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे संचालक सलील देशपांडे, संयोजन समिती सदस्य समर खंडेलवाल या वेळी उपस्थित होते. ईशप्रीतचे हे दुसरे राज्यस्तरीय विजेतेपद ठरले. याआधी या १९वर्षीय खेळाडूने २०१३मध्ये जेतेपद मिळवले होते. तो मुंबईतील खार जिमखाना येथे सराव करतो.