मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय

By Admin | Updated: May 7, 2014 10:21 IST2014-05-06T23:57:28+5:302014-05-07T10:21:40+5:30

मुंबई इंडियन्सने मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा १९ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात दुसरा विजय मिळविला.

Mumbai Indians second win | मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय

मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय

आयपीएल -७ : रॉयल चॅलेंजर्सवर १९ धावांनी मात
स्वदेश घाणेकर बेंगळुरू
रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा १९ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात दुसरा विजय मिळविला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८७ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी बेंगळुरू संघाचा डाव ८ बाद १६८ धावांत रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरू संघातर्फे पार्थिव पटेल (२६) व ख्रिस गेल (३८) यांनी ५.१ षटकांत ५३ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पार्थिव माघारी परतल्यानंतर गेलने कोहलीसोबत (३५) दुसर्‍या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करीत संघाला ९.५ षटकांत ९४ धावांची मजल मारून दिली. कोहली व डिव्हिलियर्स (९) दोन धावांच्या अंतरात माघारी परतल्यामुळे बेंगळुरू संघाचा डाव अडचणीत आला. त्यानंतर रिली रोसूने (२४) संघर्ष केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू :- ख्रिस गेल त्रि. गो. हरभजन ३८, पार्थिव पटेल त्रि. गो. हरभजन २६, विराट कोहली झे. ॲन्डरसन गो. सूयाल ३५, एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. बुमराह ०९, युवराज सिंग धावबाद ०६, रिली रोसू झे.शर्मा गो. मलिंगा २४, मिशेल स्टार्क झे. पोलार्ड गो. मलिंगा ०५, हर्षल पटेल त्रि. गो. बुमराह ०६, वरुण ॲरोन नाबाद ०७, अशोक डिन्डा नाबाद ०२. अवांतर (१०). एकूण २० षटकांत ८ बाद १६८. बाद क्रम : १-५३, २-९४, ३-११७, ४-११९, ५-१३२, ६-१५९, ७-१५१, ८-१५९. गोलंदाजी : सुयाल ३-०-३५-१, बुमराह ४-०-२२-२, हरभजन ४-०-३३-२, मलिंगा ४-०-२९-२, पोलार्ड ४-०-३७-०, रोहित १-०-६-०.

Web Title: Mumbai Indians second win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.