शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मुंबई गेम्स १५ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 7:11 PM

प्रशांत मोरे, विद्यमान कॅरम वर्ल्ड चॅम्पियन (पुरूष) आणि काजल कुमारी, वर्ल्ड चॅम्पियनशिप (महिला)ची रनरअप यांची निवड अनुक्रमे सेंट्रल चॅलेंजर्स आणि फ्लाइंग फाल्कन यांनी केली आहे.

मुंबई : ख्यातनाम खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यांनी प्रस्थापित खेळाडूंची निवड मुंबई गेम्स २०१८च्या एलिट प्लेयर्सच्या लिलावादरम्यान वैयक्तिक उपक्रमांसाठी केली आहे. या लिलावात अटीतटीने बोली लावण्यात आली, कारण फ्रँचायझींना आपल्यासाठी सर्वोत्तम युनिट्सची निवड पहिल्यावहिल्या बहु क्रीडा महोत्सवासाठी करायची होती. या महोत्सवाचे आयोजन १५ डिसेंबर २०१८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान केले जाणार आहे.प्रशांत मोरे, विद्यमान कॅरम वर्ल्ड चॅम्पियन (पुरूष) आणि काजल कुमारी, वर्ल्ड चॅम्पियनशिप (महिला)ची रनरअप यांची निवड अनुक्रमे सेंट्रल चॅलेंजर्स आणि फ्लाइंग फाल्कन यांनी केली आहे. दरम्यान, इंटरनॅशनल स्टीव्हन डायस होली क्रॉस फुटबॉल टीमसाठी परत येणार असून त्याची निवड सेंट्रल चॅलेंजर्सनी केली होती आणि त्याचवेळी कॉलिन अब्रान्चेस या विविध आयएसएल क्लब्ससाठी खेळलेल्या आणि सध्या कासल बॉइज टीमसोबत असलेला प्रख्यात खेळाडू ठाणे थंडर्सचे प्रतिनिधित्व करेल.बास्केटबॉलमध्ये नॉर्थन नाइट्स यांनी काही चांगल्या बोली लावल्या आहेत. त्यांनी सॅव्हिओ क्लब्स मेन्स टीम तसेच बोरिवली वायएमसीए गर्ल्सची निवड केली आहे, तर साऊथ मुंबई सीहॉक्सने सेंट डॉमिनिक सॅव्हिओ (पुरूष) आणि चेंबूर वायएमसीए गर्ल्सची निवड स्पर्धेत प्रतिनिधित्वासाठी केली आहे. सॅव्हिओ क्लब आणि डॉमिनिक क्लब यांना अँजेल्स जिमखान्याकडून टक्कर दिली जाणार आहे. त्याची मालकी फ्लाईंग फाल्कन्स आणि मस्तान वायएमसीएकडे आहे, जे मुंबई बास्केटबॉलचे प्रणेते आहेत आणि ते नवी मुंबई निंजाजच्या मालकीचे आहेत.कुणाल वझिरानी हे महाराष्ट्रातील १२व्या क्रमांकाचे सर्वोच्च दर्जाचे टेनिसपटू असून त्यांची निवड वेस्टर्न वॉरियर्सनी केली आहे. त्यांनी आपली महिला प्रतिनिधी म्हणून शरमीन रिझवी हिची निवड केली आहे. मिडटाऊन मावेरिक्सनी आदित्य बाळसेकर आणि महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू राजश्री राठोड यांची निवड केली आहे. ही जोडी नक्कीच या स्पर्धेत चांगलीच धमाल आणेल.

अंतिम संघः

सेंट्रल चॅलेंजर्स- फुटबॉल- होली क्रॉस, बुद्धिबळ- मिथिल आजगावकर आणि स्नेहल भोसले, कॅरम- प्रशांत मोरे आणि आयेशा मोहम्मद, बास्केटबॉल- चेंबूर पांडव (पुरूष) आणि एग्नेल्स जिमखाना (महिला), बॅडमिंटन- मिशिल शाह आणि सई शेटे, टेबल टेनिस- युगंध झेंडे आणि श्रुती अमृते, टेनिस- ध्रुव सुनिश आणि मलाइका फर्नांडिस.फ्लाइंग फाल्कन्सः फुटबॉल एमवायजे, बुद्धिबळ- गोपाळ राठोड आणि हृषिकेश चव्हाण, कॅरम- योगेश धोंगडे आणि काजल कुमारी, बास्केटबॉल- अँजेल्स जिमखाना (पुरूष) आणि हाय५इज (महिला), बॅडमिंटन- राजन, सामंत आणि अनघा, टेबल टेनिस- जश दळवी आणि ममता प्रभू, टेनिस- करण लालचंदानी आणि दक्षता गिरीशकुमार.नॉथर्न नाइट्सः फुटबॉल- बॉम्बास्टिक, बुद्धिबळ- हर्ष गर्ग आणि पुष्कर डेरे, कॅरम- विकास धारिया आणि मिताली पिंपळे, बास्केटबॉल- सॅव्हिओ क्लब (पुरूष) आणि बोरिवली वायएमसीए गर्ल्स (महिला), बॅडमिंटन- विप्लव कुवळे आणि अक्षया वारंग, टेबल टेनिस- एरिक फर्नांडिस आणि शाल्मली गोसर, टेनिस- वंशल डिसूझा आणि अमिषा धर्मेंद्रमिडटाऊन मावेरिक्स- फुटबॉल सीएफसीआय, बुद्धिबळ- प्रदीप सुतार आणि अभिजीत जोगळेकर, कॅरम- संदीप काशीनाथ आणि प्रीती खेडेकर, बास्केटबॉल- बोरिवली वायएमसीए बॉइज आणि लेडी वॉरियर्स, बॅडमिंटन- जयदेवन मेनन आणि शिवानी हेर्लेकर, टेबल टेनिस- राणे  आणि श्वेता, टेनिस- आदित्य बाळसेकर आणि राजश्री राठोड.नवी मुंबई निंजाजः फुटबॉल- कलिना थेरेशेर्स, बुद्धिबळ - केतन बोरिचा आणि गिरीश चंदनानी, कॅरम- झैद अहमद आणि मिनल लेले, बास्केटबॉल- मस्तान वायएमसीए आणि बांद्रा वायएमसीए, बॅडमिंटन- यश तिवारी आणि करीना मदन, टेबल टेनिस- झुबिन तारापोरवाला आणि अनन्या बसक, टेनिस- अरमान भाटिया आणि शरण्य शेट्टी.दक्षिण मुंबईः फुटबॉल- कलिना रेंजर्स, बुद्धिबळ- चिराग सत्कार आणि संजीव नायर, कॅरम- रियाझ अकबरअली आणि जान्हवी मोरे, बास्केटबॉल- सेंट डोमिनिक सॅव्हिओ आणि चेंबूर वायएमसीए, बॅडमिंटन- सिद्धेश आणि साक्षी शेटे, टेबल टेनिस- भवितव्य शाह आणि मृण्मयी, टेनिस- मोहित भारद्वाज आणि गौरी भागिया.वेस्टर्न वॉरियर्सः फुटबॉल- ऑटोनॉमस, बुद्धिबळ- पंकित मोटा आणि एजीएम रूपेश भोगल, कॅरम- पंकज पवार आणि संगीता जगन्नाथ, बास्केटबॉल- ऑल स्टार्स आणि माटुंगा गर्ल्स, बॅडमिंटन- विराज कुवळे आणि इशानी सावंत, टेबल टेनिस- भावेश आपटे आणि तेजल कांबळे, टेनिस- कुणाल वझिराणी आणि शरमीन रिझवी.ठाणे थंडरबोल्ट्स- फुटबॉल- कासल बॉइज, बुद्धिबळ-अमरदीप बारटक्के आणि कुशागर कृष्णातेर, कॅरम- मोहम्मद गुफ्रान आणि निलम घोडके, बास्केटबॉल- बांद्रा वायएमसीए आणि दादर गर्ल्स क्लब, बॅडमिंटन- सिद्धेश राऊत आणि रिया आरोलकर, टेबल टेनिस- तेजस कांबळे आणि दिशा हुळावळे, टेनिस- अजिंक्य बच्छाव आणि सृष्टी रे.

टॅग्स :Mumbaiमुंबई