शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शहर संघाला सर्वसाधारण जेतेपद

By admin | Updated: January 11, 2016 03:11 IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने पुरुष व महिला गटात मिळून २४६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने पुरुष व महिला गटात मिळून २४६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. राज्य राखीव पोलीस बल संघाला १२७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राज्य राखीव पोलीस बल १च्या मैदानावर झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुष गटात कोल्हापूर रेंज संघाने कोकण रेंज संघाला, तर महिला गटात प्रशिक्षण संचालनालयाने मुंबई शहर संघाला नमवित जेतेपद मिळवले. वानवडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर हा सामना झाला. पहिल्या डावात कोकण रेंज संघाने ८-७ अशी आघाडी घेतली. कोल्हापूर रेंजने दुसऱ्या डावात १०-९ अशी आघाडी घेत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांना पाच चढाया करण्याची संधी देण्यात आली. कोकणच्या एन.एच. ईस्वालकर, आर.सी. गमरे, बी.पी. ठाले, एस.एम. बेलेकर यांनी प्रत्येकी १ गुण मिळविला. कोल्हापूर रेंजच्या सुलतान डांगे, मंगेश भगत, स्वप्निल मोहिते यांनी प्रत्येकी १, तर रोहित बनेने २ गुण मिळवित संघाचा विजय साकार केला. महिला गटात प्रशिक्षण संचालनालयाने मुंबई शहर संघाला २१-१९ असे नमवित विजेतेपद मिळवले. पहिल्या डावात प्रशिक्षण संचालनालयाने १३-६ अशी भक्कम आघाडी घेत विजेतेपदाचा पाया घातला. दुसऱ्या डावात मुंबईने १३-८ अशी आघाडी घेत सामान्यत: पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूर्वार्र्धातील ७ गुणांची पिछाडी निर्णायक ठरली. बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात अमरावती रेंज संघाने नागपूर रेंज संघाला २९-२४, तर पुरुष गटात मुंबई शहर संघाने कोल्हापूर रेंज संघाला ५६-४२ असे नमवित अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. या वेळी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पुण्याचे आयुक्त के.के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद उपस्थित होते.