प्रतिनिधीपदाचा मल्ल्याचा राजीनामा
By Admin | Updated: July 12, 2017 00:42 IST2017-07-12T00:42:18+5:302017-07-12T00:42:18+5:30
क्रीडा मंत्रालयाने दखल दिल्यानंतर एफआयएच्या भारतीय मोटार स्पोटर््स संस्थेच्या प्रतिनिधीपदाचा विजय मल्ल्याने राजीनामा दिला

प्रतिनिधीपदाचा मल्ल्याचा राजीनामा
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने दखल दिल्यानंतर एफआयएच्या भारतीय मोटार स्पोटर््स संस्थेच्या प्रतिनिधीपदाचा विजय मल्ल्याने राजीनामा दिला. एफआयएच्या विश्व मोटार खेळ परिषदेच्या बैठकीपूर्वी हा राजीनामा दिला. क्रीडा मंत्रालयाने एफएमएससीआय यांना निर्देश दिले होते. आता एफएमएससीआय डिसेंबरमध्ये होणाऱ्या एफआयएच्या बैठकीत
नव्या प्रतिनिधीचे नामांकन सादर करू शकते. एफएमएससीआयचे माजी अध्यक्ष विकी चंडोकने मल्ल्याचा भारतीय पासपोर्ट रद्द केल्यानंतर एफआयएच्या सर्व बैठकीत भाग घेतला. (वृत्तसंस्था)