भारतात बालविवाह प्रथा संपायला लागणार आणखी ५० वर्षे -युनिसेफ

By Admin | Updated: August 26, 2014 21:56 IST2014-08-26T21:56:24+5:302014-08-26T21:56:24+5:30

कोलकाता : भारतात गत दोन दशकांत बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे़ पण देशातून या कूप्रथेचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी आणखी ५० वर्षे लागतील, असे कटू वास्तव युनिसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड) बोलून दाखवले आहे़

More 50 years to end child marriage practice in India - UNICEF | भारतात बालविवाह प्रथा संपायला लागणार आणखी ५० वर्षे -युनिसेफ

भारतात बालविवाह प्रथा संपायला लागणार आणखी ५० वर्षे -युनिसेफ

लकाता : भारतात गत दोन दशकांत बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे़ पण देशातून या कूप्रथेचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी आणखी ५० वर्षे लागतील, असे कटू वास्तव युनिसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड) बोलून दाखवले आहे़
आज मंगळवारी येथे भारतातील युनिसेफच्या बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भारताच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. देशातील बालविवाह आणि ते रोखण्यासाठीचे प्रयत्न चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या़ गत दोन दशकांत बालविवाहाचे प्रमाण प्रतिवर्ष एक टक्क्याने कमी झाले आहे. पण ते शून्यावर येण्यासाठी आणखी ५० वर्षे जावी लागतील. या दीर्घकाळात लाखो मुली बालविवाहाच्या कूप्रथेच्या शिकार ठरलेल्या असतील, असे त्या म्हणाल्या. यासाठी त्यांनी एका पाहणी निष्कर्षाचा दाखलाही दिला. त्या म्हणाल्या की, २० ते २४ वर्षे वयोगटातील महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असता, यापैकी पाचपैकी दोन महिलांनी त्यांचा बालविवाह झाल्याचे सांगितले. ४३ टक्के महिलांचा १८ वर्षांपेक्षा कमी वयातच लग्न झाले होते. भारतात अद्यापही काही जाती आणि समूहांमध्ये बालविवाहाची प्रथा जिवंत आहे. दुर्दैवाने ती रोखण्याचा प्रयत्न अतिशय संथ सुरू आहेत. जुलैच्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात सांगितल्यानुसार, बालविवाहात भारताचे स्थान सहावे आहे.

Web Title: More 50 years to end child marriage practice in India - UNICEF