मोईन-उल-उलूम संघाने जिंकली विभागीय स्पर्धा
By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:35+5:302014-08-25T21:40:35+5:30
सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

मोईन-उल-उलूम संघाने जिंकली विभागीय स्पर्धा
स ब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा औरंगाबाद : परभणी येथे नुकत्याच झालेल्या सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय विभागीय फुटबॉल स्पर्धेत मोईन-उल-उलूम संघाने १७ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. मोईन-उल-उलूमने अंतिम सामन्यात केम्ब्रिज प्रशालेविरुद्ध विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत बीड येथील मिलया हायस्कूलचा १-0 असा पराभव केला. निर्णायक गोल उजैर खान याने केला. अंतिम सामन्यात मोईन-उल-उलूमने केम्ब्रिज प्रशालेवर ५-0 असा दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाकडून अफरोज कुरैशीने दोन गोल केले. सय्यद रिजवान, मोहंमद परवेज, ईशाद देशमुख यांनी प्रत्येकी १ गोल केला. या विजेतेपदामुळे मोईन-उल-उलूम संघ ३१ ऑगस्टपासून नागपूर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल औरंगाबाद सिल्क मिल्स एज्युकेश्न सोसायटीचे अध्यक्ष मुजतबा महेमूद, सचिव झिया अहमद खान, मुख्याध्यापिका यास्मिन फरजाना, उपमुख्याध्यापक शहेजादखान चिंतामणी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.