मोहम्मद हफीजला गोलंदाजीचे परीक्षण करुन घेण्याचे आदेश

By Admin | Updated: August 27, 2016 20:42 IST2016-08-27T20:42:41+5:302016-08-27T20:42:41+5:30

पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद हफीज याला गोलंदाजीचे परीक्षण करून घेण्याचे आदेश मिळाले आहेत

Mohammad Hafeez's order to test the bowling | मोहम्मद हफीजला गोलंदाजीचे परीक्षण करुन घेण्याचे आदेश

मोहम्मद हफीजला गोलंदाजीचे परीक्षण करुन घेण्याचे आदेश

>- ऑनलाइन लोकमत 
कराची, दि. 27 - पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद हफीज याला गोलंदाजीचे परीक्षण करून घेण्याचे आदेश मिळाले आहेत. संयुक्त अरब अमिरात येथे पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाºया मालिकेआधी परीक्षण करण्यास आयसीसीने हफीजला बजावले.
 
हफीज इंग्लंड दौ-यापासून खराब फॉर्ममुळे त्रस्त आहे. आयसीसी परीक्षण करण्यासही तो टाळाटाळ करीत आहे. त्याच्यावर असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्षभराची बंदी १२ जुलै रोजी संपली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ऑल राऊंडरची भूमिका वठवित असलेल्या हफीजने संघात पुनरागमनाआधी परीक्षण करून घ्यावे, असा सल्ला पीसीबीच्या एका ज्येष्ठ सदस्याने त्याला आधी दिला होता. पाक क्रिकेटचे हित लक्षात घेऊन हफीजने लवकरात लवकर परीक्षण करून घ्यावे, असे या अधिकाºयाचे मत होते. विंडीजविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी हफीजने २३ सप्टेंबरपर्यंत स्वत:च्या गोलंदाजीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.
 

Web Title: Mohammad Hafeez's order to test the bowling