मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : माइक हसी

By Admin | Updated: May 24, 2015 01:21 IST2015-05-24T01:21:50+5:302015-05-24T01:21:50+5:30

माइक हसी याने संघाला उद्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सला नमविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.

Mike Hussey will do well against Mumbai | मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : माइक हसी

मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : माइक हसी

रांची : चेन्नई सुपर किंग्जला विक्रमी सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माइक हसी याने संघाला उद्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सला नमविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.

१४० हसीच्या ४६
चेंडूंतील ५६ धावांमुळे चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध १४० धावांचे लक्ष्य तीन गडी राखून पूर्ण केले.

खूप चांगली लढत होती. २०१३ मध्ये आम्ही मुंबईला नमवून अंतिम फेरी गाठली; परंतु फायनलमध्ये त्याच्याकडून पराभूत झालो. आताही तसेच होईल. आम्ही क्वॉलिफायरमध्ये त्यांच्याकडून पराभूत झालो; परंतु फायनल आम्ही जिंकू, अशी आशा वाटते. मुंबई एक चांगला संघ असून, ते चांगले खेळत आहेत. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावेल, असे हसी म्हणाला़

Web Title: Mike Hussey will do well against Mumbai