मेक्सिको हॉलंड एक्स्प्रेस रोखणार?
By Admin | Updated: June 29, 2014 01:46 IST2014-06-29T01:46:52+5:302014-06-29T01:46:52+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी मेक्सिको आणि हॉलंड उपउपांत्यपूर्व फेरीत झुंजणार आहेत़ मेक्सिकोचे लक्ष्य हॉलंडचे विजयी अभियान रोखणो हे असेल.

मेक्सिको हॉलंड एक्स्प्रेस रोखणार?
>फोर्टालेजा : फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी मेक्सिको आणि हॉलंड उपउपांत्यपूर्व फेरीत झुंजणार आहेत़ मेक्सिकोचे लक्ष्य हॉलंडचे विजयी अभियान रोखणो हे असेल. दुसरीकडे, हॉलंड संघ आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवून थाटात स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी मैदानात उतरेल.
चिलीविरुद्धच्या साखळी लढतीतील अंतिम सामन्यात हॉलंडचा अनुभवी वॉन पर्सी याला निलंबित करण्यात आले होत़े मात्र, मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत तो खेळणार असल्यामुळे संघात चैतन्य निर्माण झाले आह़े तो आपला साथीदार रॉबेनसोबत मजबूत अॅटॅक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ या जोडीने जर्मनीचा थॉमस म्युलर, अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेयमार यांच्या प्रत्येकी 4 गोलनंतर स्पर्धेत प्रत्येकी 3 गोल नोंदविण्याची किमया साधली आह़े
वर्ल्ड कपमध्ये 1क् गोल करून हॉलंड साखळी फेरीत सर्वाधिक स्कोअर करणारा संघ आह़े मात्र, मेक्सिकोनेही साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली आह़े त्यांनी क्रोएशिया आणि कॅमेरूनवर शानदार विजय मिळविला होता, तर ब्राझीलविरुद्धच्या लढतीत त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागल़े हॉलंड संघात वॉन पर्सी याचे पुनरागमन होणार असल्यामुळे 33 वर्षीय डिर्क कुयट याला बाहेर बसावे लागेल़ मात्र, बदली खेळाडू म्हणून कुयट खेळू शकतो़ दरम्यान, 2 सामन्यांत 2 गोल करूनही 2क् वर्षीय फॉरवर्ड मेम्फिस डिपेय याला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आह़े
स्पर्धेत जबरदस्त खेळ करणारा हॉलंड संघ ‘ब’ गटात 9 गुणांसह आघाडीवर,तर मेक्सिको संघ ‘अ’ गटात 7 गुणांसह दुस:या क्रमांकावर विराजमान आह़े हॉलंड संघात वॉन पर्सी आणि रॉबेनसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असला, तरी मेक्सिकोविरुद्ध त्यांना सावध खेळ करावा लागेल.
या सामन्यात पराभव झाल्यास संघाला घरचा रस्ता धरावा लागणार आह़े त्यामुळे दोन्ही संघांना जबाबदारीने खेळ करावा लागेल़ सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत कोस्टारिका किंवा ग्रीस यांपैकी एकाशी झुंज द्यावी लागेल़ (वृत्तसंस्था)
हेड टू हेड..
नेदरलॅँड आणि मेक्सिको यांच्यात आतार्पयत केवळ सहाच सामने झाले. त्यामुळे एकमेकांविरुद्ध खेळण्याचा उभय संघांना फारसा अनुभव नाही. त्यात नेदरलॅँडने 3, तर मेक्सिकोने एक सामना जिंकला आहे. एक लढत अनिर्णीत राहिली होती. या दोन्ही संघांतर्फे एकूण 22 गोल नोंदविण्यात आले. त्यातील 11 गोल नेदरलॅँडच्या, तर 11 गोल मेक्सिकोच्या नावे आहेत. त्यामुळे आकडेवारीवरून तरी उभय संघ तुल्यबळ असल्याचे दिसून येते.