शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत भारतात अजून मागास

By admin | Published: November 21, 2014 12:21 AM

भारतातील बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत इतर देशांच्या तुलनेत अजूनही मागासलेली आहे. एक प्रशिक्षक ५० ते ६० खेळाडूंना एकाच वेळी प्रशिक्षण देतो

स्वदेश घाणेकर, मुंबईभारतातील बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत इतर देशांच्या तुलनेत अजूनही मागासलेली आहे. एक प्रशिक्षक ५० ते ६० खेळाडूंना एकाच वेळी प्रशिक्षण देतो. याउलट इतर देशांमध्ये खेळाडूमागे एक प्रशिक्षक, अशी पद्धत आहे. अशीच पद्धत आपणही अवलंबविल्यास भारतात आणखी मेरी तयार होतील, असे स्पष्ट मत मेरी कोमचा पती के. ओन्लेर याने मांडले. पाच वेळेची जगज्जेती, आॅलिम्पिक व आशियाई सुवर्णपदक विजेती एम. सी. मेरी कोमच्या यशामागे ओन्लेर खंबीरपणे उभा होता. मेरीने कोणत्या परिस्थितीशी झगडून हे यशोशिखर गाठले, याची जाण ओन्लेरला आहे आणि त्यामुळेच मेरी कोमच्या बॉक्सिंग अकादमीतून तो मेरीसोबत सर्वोत्तम बॉक्सर घडविण्यासाठी झटत आहे. या अकादमीतील खेळाडूंच्या निवडीपासून सरावापर्यंतची धावपळ ओन्लेर करतो.अकादमीविषयी ओन्लेर म्हणाला, ‘‘२००६ मध्ये आम्ही ही अकादमी स्थापन केली. त्या वेळी मेरी पाच वेळेची जगज्जेतीही नव्हती. बॉक्सिंगसाठी लागणाऱ्या जागेपासून साहित्यापर्यंत जुळवाजुळव करताना आमची चांगलीच दमछाक झाली. स्वखर्चाने कित्येक वर्षे आम्ही ही अकादमी चालवली. मेरी कोमचा यशाचा आलेख चढता राहिल्यामुळे आणि ती प्रकाशझोतात आल्यानंतर २०११ मध्ये ‘स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया’ने (साइ) आम्हाला मान्यता दिली. साइच्या योजनांमधून निधीही उपलब्ध होऊ लागला आणि त्यातूनच बॉक्सिंगसाठी आवश्यक साहित्यही आम्हाला मिळाले. पुढे क्रीडा मंत्रालयानेही निधी देण्यास सुरुवात केली. अनेकांचा पाठिंबा मिळत असला तरी भारतातील एकूणच प्रशिक्षण पद्धतीत बदल होणे अपेक्षित आहे. चीन, अमेरिका, कोरिया, थायलंड अशा अनेक देशांमध्ये मी फिरलो आहे आणि तेथे एका खेळाडूसाठी एक प्रशिक्षक, अशी पद्धत आहे. भारतात हे अशक्य आहे. येथे चांगल्या बॉक्सिंग प्रशिक्षकांची कमतरता असल्याने एक प्रशिक्षक एकाच वेळी ५०-६० खेळाडूंना शिकवतात. अशा परिस्थितीत चॅम्पियन घडणार कसे, असा सवाल ओन्लेर करतो. आमच्या अकादमीतही प्रत्येक खेळाडूमागे प्रशिक्षक देणे शक्य नाही.