इराणविरुद्धही ‘मेस्सी’लीला चालणार ?
By Admin | Updated: June 21, 2014 00:48 IST2014-06-21T00:48:08+5:302014-06-21T00:48:08+5:30
अर्जेटिना संघ फुटबॉल विश्वचषकात शनिवारी जेव्हा इराणविरुद्ध एफ गटाच्या लढतीत उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष्य विजयाबरोबरच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याचे असेल.

इराणविरुद्धही ‘मेस्सी’लीला चालणार ?
>बेलो होरिजोंटे : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा अर्जेटिना संघ फुटबॉल विश्वचषकात शनिवारी जेव्हा इराणविरुद्ध एफ गटाच्या लढतीत उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष्य विजयाबरोबरच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याचे असेल.
अर्जेटिनाने त्याच्या पहिल्या सामन्यात बोस्निया-हर्जेगोविनाला 2-1 असे पराभूत केले होते. संघाने सामन्याच्या सुरुवातीलाच डिफेन्समध्ये पाच खेळाडू उतरवले होते आणि पुन्हा 4-3-3 अशा व्यूहरचनेने ते दिसले होते. त्यामुळे स्टार स्ट्राइकर मेस्सीला विश्वचषकामधील त्याचा पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती. इराणचे प्रशिक्षक कालरेस क्विरोज यांच्या मते, अर्जेटिनाला पराभूत करण्यासाठी त्याच्या संघाला चमत्काराची आवश्यकता असेल. तथापि, इराण अर्जेटिनाविरुद्ध आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेऊ शकतो.
रँकिंगमध्ये आशियाचा नंबर वन संघ इराणने आपल्या गत सामन्यात बलाढय़ नायजेरियाला गोलरहित ड्रॉवर रोखले होते आणि विश्वचषकाच्या इतिहासात संघाने प्रतिस्पध्र्याला गोल करू न देण्याची ही पहिलीच वेळ
होती. तसेच इराणने 1978 नंतर चार विश्वचषकांमध्ये आपला सहावा गुण नोंदवला. जर अर्जेटिनाने हा सामना जिंकला तर तो सहा गुणांसह अव्वलस्थानी जाईल. इराणला विश्वचषकामध्ये एकमेव विजय 1998 मध्ये अमेरिकेविरुद्ध मिळाला होता; परंतु स्पर्धेत होणा:या खळबळजनक निकालापासून ते प्रेरणा घेऊ शकतात. (वृत्तसंस्था)
डिएगो मॅराडोनानंतर र्अजेटिनाचा सर्वोत्तम खेळाडू मानला जाणारा मेस्सी विश्वचषक जिंकण्यास आतुर आहे. बार्सिलोनासाठी त्याचे शानदार विक्रम आहेत; परंतु या कामगिरीत तो विश्वचषकाचा ताजही
जोडू इच्छित आहे. त्यामुळे त्याने इराणविरुद्ध आक्रमक खेळ करण्याची तयारी केली आहे. इराणचा अश्कान देजागाह व स्ट्राइकर रेज गुजानेजाद यांच्यासाठी फार कमी वाव आहे.