मेस्सीविरुद्ध नायजेरिया सामना रंगणार
By Admin | Updated: June 25, 2014 02:06 IST2014-06-25T02:06:16+5:302014-06-25T02:06:16+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित करणारा अर्जेटिना संघ बुधवारी नायजेरियाविरुद्ध सामना खेळणार आह़े

मेस्सीविरुद्ध नायजेरिया सामना रंगणार
>पोर्तो एलग्रे : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित करणारा अर्जेटिना संघ बुधवारी नायजेरियाविरुद्ध सामना खेळणार आह़े एफ गटातील ही लढत लियोनेल मेस्सीविरुद्ध नायजेरिया अशीच रंगणार आह़े
अर्जेटिनाने साखळी फेरीतील पहिल्या लढतीत बोस्नियाविरुद्ध 2-1 ने आणि दुस:या लढतीत इराणवर 1-क् अशी मात करीत अंतिम 16 संघांत आपले स्थान निश्चित केल़े विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांत स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने विजयी गोल नोंदविले होत़े त्यामुळे मेस्सीला गोल करण्यापासून रोखणो हे नायजेरियन खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आह़े
स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा:या अर्जेटिनाने जर या लढतीत नायजेरियाला धूळ चारली किंवा सामना बरोबरीत सोडविला, तर हा संघ एफ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल़ दुसरीकडे नायजेरियाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना केवळ ड्रॉ करण्याची गरज आह़े नायजेरियाचे 2 सामन्यांत 4 गुण झाले आह़े आणखी एका गुणासह ते बाद फेरीत पोहोचतील़
नायजेरिया संघ या लढतीत पराभूत झाला आणि या गटातील अन्य सामन्यांत इराणने बोस्नियावर मात केली़ तेव्हा नायजेरिया आणि इराण यांचे प्रत्येकी 4 गुण होईल़ अशा परिस्थितीत गोलच्या सरासरीनुसार संघाच्या बाद फेरीचा निर्णय होईल़
जर तरच्या फेरीत अडकायचे नसेल, तर नायजेरियाला अर्जेटिनाविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आह़े नायजेरियाचा इराणविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता़ तर इराणविरुद्ध त्यांनी 1-क् ने विजय मिळविला होता़
अर्जेटिनाची विजयी घोडदौड रोखायची असेल, तर नायजेरियाला आतार्पयतचा सवरेत्कृष्ट खेळ करावा लागणार आह़े हे अशक्यप्राय नायजेरिया करूशकला, तर त्यांच्यासाठी बाद फेरीचा रस्ता खुला होईल़ (वृत्तसंस्था)