मेस्सी हा अर्जेंटिनासाठी ‘ओअॅसिस’ : कोच साबेल
By Admin | Updated: July 7, 2014 05:14 IST2014-07-07T05:14:09+5:302014-07-07T05:14:09+5:30
लियोनेल मेस्सी हा अर्जेंटिनासाठी ‘ओअॅसिस’ (वाळवंटातील झरा) आहे, असे मत त्यांचे प्रशिक्षक अॅलेजान्ड्रो साबेल यांनी विजयानंतर व्यक्त केले

मेस्सी हा अर्जेंटिनासाठी ‘ओअॅसिस’ : कोच साबेल
ब्रासिलिया : लियोनेल मेस्सी हा अर्जेंटिनासाठी ‘ओअॅसिस’ (वाळवंटातील झरा) आहे, असे मत त्यांचे प्रशिक्षक अॅलेजान्ड्रो साबेल यांनी विजयानंतर व्यक्त केले. अर्जेंटिनाने बेल्जियमचा १-० ने पराभव करीत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. चार वेळा विश्वातील सर्वाेत्तम खेळाडू ठरलेल्या मेस्सीला गोल करण्यात यश आले नाही. अडथळा वेळेत त्याला गोल नोंदविण्याची संधी होती. अखेर १९९० नंतर प्रथमच त्यांनी उपांत्य फेरी गाठली.
साबेल म्हणाले, की मेस्सी हा उत्तम खेळला. त्याचे खेळातील कसब, बचावपटूंचे लक्ष विचलित करणे, त्यांना चुकवत चेंडू योग्य दिशेने वळविणे यात मेस्सी तरबेज आहे. प्रत्येक वेळी तो चेंडूवर ताबा मिळवितो. त्यामुळे प्रश्न केवळ गोल नोंदविण्याचाच राहत नाही. मेस्सीसारखा खेळाडू तुमच्याजवळ असेल तर प्रतिस्पर्धी खेळाडू कुणीही असो, तो आपल्या चतुर पायांनी अनेकांना भुलवतो. तो एक ‘ओअॅसिस’ आहे.