शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

पदक मिळविले, पण मोबाइल गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:47 AM

सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले.

- रोहित नाईक मुंबई : सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले. यासह त्याने ५ लाख रुपयांच्या रोख पुरस्कारावरही कब्जा केला. मात्र, यानंतरही तो काहीसा निराश होता. कारण स्पर्धेदरम्यान त्याचा मोबाइलच गहाळ झाला. यामुळे सोशल मीडियावर कायम ‘अ‍ॅक्टिव्ह’ असणाऱ्या नितेंद्रसिंगला आपल्या विजयाची पोस्ट टाकता येत नव्हती आणि हेच त्याच्या निराशेमागचे मुख्य कारण होते.गेल्या काही स्पर्धांमध्ये खालावलेल्या कामगिरीमुळे नितेंद्रसिंगवर अनेकांनी टीकेचा भडिमार केला होता. यासाठीच मुंबई मॅरेथॉनच्या दोन दिवसआधी त्याने सोशल मीडियावर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. मात्र, मॅरेथॉनदरम्यानच मोबाइल गहाळ झाल्याने, विजयी कामगिरीची माहिती सोशल मीडियावर टाकता न आल्याने सुवर्ण पटकावल्यानंतरही नितेंद्र निराश झाला.‘मॅरेथॉनदरम्यान मोबाइल प्रशिक्षकांकडे दिलेला मोबाईल कुठेतरी गहाळ झाला,’ असे नितेंद्रने सांगितले. याविषयी नितेंद्रने अधिक सांगितले की, ‘मला माझ्या वेळेत सुधारणा करायची होती. माझ्या खालावलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, त्यांना मला चोख उत्तर द्यायचे होते. यासाठीच मी मुंबई मॅरेथॉनआधी फेसबुकवर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते, पण दुर्दैवाने माझा मोबाइल हरवल्याने, मी जिंकल्यानंतरही फेसबुकवर पोस्ट टाकू शकलो नाही. मला मोबाइल गेल्याचे दु:ख नसून, सोशल मीडियावर अद्याप मी माझे अपडेट टाकू शकत नाही, याचे दु:ख जास्त आहे.’त्याचप्रमाणे, ‘या विजेतेपदानंतर माझ्या टीकाकारांना नक्कीच चोख उत्तर मिळाले असणार. मी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. त्यामुळेच अजून पोस्ट टाकता न आल्याने निराश आहे, पण लवकरच माझी पोस्ट अपलोड होईल. आता मी दुसºया फोनचा वापर करेन, पण त्यासाठी मला सर्व अ‍ॅप पुन्हा डाउनलोड करावे लागतील,’ असेही नितेंद्रने म्हटले.>लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला!यंदा मुंबई मॅरेथॉन मार्गात थोडा बदल करण्यात आला होता, तसेच सुरुवातीला आणि अंतिम क्षणी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय धावताना मार्गात काही हौशी धावपटूंचा अडथळाही झाला. बाइकर्सही आमच्या मधेमधे येते असल्याने अनेकदा गर्दीतून आम्ही मार्ग काढला. याशिवाय आम्हाला कुठेही अडचण आली नाही, पण हे होतच असते. - नितेंद्रसिंग रावत

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन