मेरी कोमचा क्रीडा मंत्र्यांना बुक्यांचा प्रसाद, व्हिडीओ झाला वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:59 IST2018-11-01T19:57:07+5:302018-11-01T19:59:06+5:30
काही वेळा योग्य खेळाडूंना पुरस्कार न दिल्याचेही बोलले जाते. त्यामुळे बऱ्याचदा खेळाडूंचा क्रीडा मंत्र्यांवर रोष असतो.

मेरी कोमचा क्रीडा मंत्र्यांना बुक्यांचा प्रसाद, व्हिडीओ झाला वायरल
नवी दिल्ली : काही वेळा खेळाडूंकडे गुणवत्ता असून, विक्रमी कामगिरी करूनही त्यांना सरकार दरबारी डावलले जाते. काही वेळा योग्य खेळाडूंना पुरस्कार न दिल्याचेही बोलले जाते. त्यामुळे बऱ्याचदा खेळाडूंचा क्रीडा मंत्र्यांवर रोष असतो. काही वेळा खेळाडू तसे बोलूनही दाखवतात. पण आतापर्यंत एखाद्या खेळाडूने क्रीडा मंत्र्यांवर हात उचलल्याचे पाहायला मिळाले नाही. पण आज मात्र भारताची जगविख्यात महिला बॉक्सरने क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना बुक्क्यांचा चांगलाच प्रसाद दिल्याचे पाहायला मिळाले. पण हा प्रसाद देत असताना त्याचा व्हिडीओ मात्र चांगलाच वायरल झाला.
हा पाहा व्हिडीओ
#WATCH: Sports Minister Rajyavardhan Singh Rathore in a friendly boxing bout with boxing champion Mary Kom at Indira Gandhi Stadium in Delhi. pic.twitter.com/NXRaxqAkPQ
— ANI (@ANI) November 1, 2018
काही जणांना मेरीने रागाने राठोड यांना बुक्के मारले असे वाटत असेल. पण तसे घडले मात्र नाही. राठोड यांनी मेरीबरोबर एक मैत्रीपूर्ण सामना खेळायचे ठरवले होते. तो सामना आज खेळवला गेला आणि त्यावेळी मेरीने आपली करामत दाखवली.