झुंजीनंतर मारिआ फायनलमध्ये
By Admin | Updated: June 6, 2014 09:20 IST2014-06-06T01:11:04+5:302014-06-06T09:20:12+5:30
निर्णायक सेटर्पयत रंगतदार ठरलेल्या उपांत्य लढतीत सातव्या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने 18व्या मानांकित कॅनडाच्या युजेनी बुकार्डची झुंज मोडून काढली.

झुंजीनंतर मारिआ फायनलमध्ये
>पॅरिस : निर्णायक सेटर्पयत रंगतदार ठरलेल्या उपांत्य लढतीत सातव्या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने 18व्या मानांकित कॅनडाच्या युजेनी बुकार्डची झुंज मोडून काढली. या विजयासह तिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत सलग तिस:यांदा एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या लढतीत शारापोव्हाने बुकार्डचा 4-6, 7-5, 6-2ने पराभव केला. जेतेपदासाठी तिला रोमानियाच्या सिमोना हॅलेपशी दोन हात करावे लागतील.
2क्12मध्ये जेतेपदाचा मान मिळविणा:या सातव्या मानांकित शारापोव्हाने पहिला सेट 4-6ने गमावला. त्यानंतर मात्र सूर गवसलेल्या शारापोव्हाने चमकदार कामगिरी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुस:या सेटमध्ये शारापोव्हाने 7-5ने बाजी मारत 1-1 अशी बरोबरी साधली. तिस:या व निर्णायक सेटमध्ये शारापोव्हाने वर्चस्व गाजविले. तिस:या सेटमध्ये शारापोव्हाने 6-2ने सरशी साधत विजय साकारला. 2क्वर्षीय बुकार्डला सलग दुस:यांदा ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बुकार्ड उपांत्य फेरीत पराभूत झाली होती.
दुस:या उपांत्य फेरीच्या लढतीत सिमोनाने जर्मनिच्या अॅड्रीआ पेटकोवीचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. सिमोनाने पहिला सेट 6-2 असा जिंकल्यानंतर दुस:या सेटमध्ये तिला पेटकोविककडून कडवी झुंज मिळाली. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या या लढतीत सिमोनाने बाजी मारून ही लढत 6-2, 7-6 (7-4) अशी जिंकली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी डेव्हिड फेररचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. नदालला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अव्वल मानांकित नदालने पाचव्या मानांकित फेररची झुंज 4-6, 6-4, 6-क्, 6-1ने मोडून काढली.
मरेने 23व्या मानांकित फ्रान्सच्या
गेल मोंफिल्सविरुद्ध निर्णायक सेटर्पयत रंगतदार ठरलेल्या लढतीत
6-4, 6-1, 4-6, 1-6, 6-क्ने
सरशी साधली. मोंफिल्सच्या पराभवामुळे फ्रान्सचे फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे स्वप्न भंगले.
नदाल आणि फेरर यांच्यादरम्यान उपांत्यपूर्व फेरीची लढत गेल्या
वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती ठरली. पहिल्या सेटमध्ये 6-4ने
सरशी साधल्यानंतर फेररला
रॉबिन सॉडरलिंगच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी
असल्याचे वाटत होते.
सोडरलिंग रोला गॅरोजमध्ये नदालला पराभूत करणारा एकमेव टेनिसपटू आहे. पहिला
सेट गमाविणा:या नदालने त्यानंतर
मात्र चमकदार कामगिरी करीत
वर्चस्व गाजविले. (वृत्तसंस्था)
ग्रोएनफेल्ड-रॉजर
मिश्र दुहेरीचे विजेते
च्जर्मनीची एन लिना ग्रोएनफेल्ड व हॉलंडचा ज्यां ज्युलियन रॉजर या बिगरमानांकित जोडीने गुरुवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत जर्मनीची ज्युलिया जॉज्रेज व सर्बियाचा नेनाद जिमोनङिाच या आठव्या मानांकित जोडीचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत जेतेपदाचा मान मिळविला.
च्ग्रोएनफेल्ड-रॉजर जोडीने जॉज्रेज-जिमोनङिाच जोडीचा 4-6, 6-2, 1क्-7ने पराभव केला. ग्रोएनफेल्डने 2क्क्9मध्ये बहामासच्या मार्क नोल्सच्या साथीने विम्बल्डनमध्ये मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. रॉजरने गेल्या वर्षी रशियाच्या व्हेरा दुशेविनाच्या साथीने विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.