मनोज कुमारला अजरुन पुरस्कार

By Admin | Updated: September 17, 2014 23:05 IST2014-09-17T23:05:07+5:302014-09-17T23:05:07+5:30

अजरुन पुरस्कार नाकारण्यात आल्यानंतर कायदेशीर लढाई लढणारा बॉक्सर मनोज कुमार अखेर जिंकला. त्याला अजरुन पुरस्कार मिळणार हे निश्चित झाले आहे.

Manoj Kumar received the Arjuna Award | मनोज कुमारला अजरुन पुरस्कार

मनोज कुमारला अजरुन पुरस्कार

नवी दिल्ली : अजरुन पुरस्कार नाकारण्यात आल्यानंतर कायदेशीर लढाई लढणारा बॉक्सर मनोज कुमार अखेर जिंकला. त्याला अजरुन पुरस्कार मिळणार हे निश्चित झाले आहे. क्रीडा मंत्रलयाने त्याचे नामांकनही मंजूर केले.
2क्1क् च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण विजेता असलेला मनोज कुमारला क्रीडा मंत्रलयाचा हा निर्णय बुधवारी सकाळी कळला.तो म्हणाला,‘ क्रीडा मंत्रलयाचे संयुक्त सचिव ओंकार केडिया यांनी माङया भावाला कालच फोनवर ही माहिती दिली. ती आज सकाळी मला समजली.
मनोज  म्हणाला,‘ न्यायालयाची पायरी चढणो मला चांगले वाटत नव्हते. पण माङयाकडे पर्याय शिल्लक नव्हता. माझी भूमिका योग्य होती याचा मला आनंद वाटतो. आशियाडपूर्वीचा हा आनंद माङो मनोधैर्य उंचावेल.’ मोठा भाऊ राजेश याचा मी आभारी आहे. व्यवस्थेविरुद्ध त्याने माङयासाठी संघर्ष केला.  अधिकार मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली याबद्दल खेदही वाटतो, असे त्याने सांगितले.  मंत्रलयातर्फे अतिरिक्त महाधिवक्ता संजय जैन यांनी न्यायालयापुढे मान्य केले की, मनोजचा अर्ज पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आला नव्हता कारण निवड समितीने चुकीने त्याला डोपिंग प्रकरणात अडकल्याचे गृहित धरले होते. (वृत्तसंस्था)
 
च्अजरुन पुरस्कारासाठी बॉक्सर जयभगवानची वादग्रस्तरित्या निवड केल्याने मनोजने क्रीडा मंत्रलयातील अधिका:यांशी संपर्क साधला. अधिका:यांनी त्याला समीक्षा बैठकीनंतर पुरस्कार यादीत नाव जोडले जाईल, असे आश्वासन दिले. पण, प्रत्यक्षात तसे काहीही न झाल्यामुळे  मनोजने न्यायालयात धाव घेतली होती.

 

Web Title: Manoj Kumar received the Arjuna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.