मंदार भरताव आणि संध्या बापेरकर यांना दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:33 IST2020-03-05T13:32:50+5:302020-03-05T13:33:22+5:30

आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेत मंदार भरताव आणि संध्या बापेरकर यांनी अनुक्रमे पुरुष एकेरी व दुहेरी आणि महिला एकेरी व दुहेरी गटाचे जेतेपद नावावर केले. 

Mandar Bharatkar and Sandhya Baparkar double crown in carrom tournament | मंदार भरताव आणि संध्या बापेरकर यांना दुहेरी मुकुट

मंदार भरताव आणि संध्या बापेरकर यांना दुहेरी मुकुट

आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेत मंदार भरताव आणि संध्या बापेरकर यांनी अनुक्रमे पुरुष एकेरी व दुहेरी आणि महिला एकेरी व दुहेरी गटाचे जेतेपद नावावर केले. 

अग्रमानांकित मंदार भरतावने तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत तिसरा मानांकित वसीम खानचा २५-०, १२-२५, २५-११ अशी कडवी झुंज मोडीत काढली आणि तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मानकरी ठरला. महिला एकेरीच्या अंतीम फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित संध्याने सहकारी उषा कांबळेचा तीन गेम रंगलेल्या चुरशीच्या लढतीत ९-२५, २५-१२, २५-९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यांदाच महिला गटाच्या विजेतेपदावर नाव कोरले.  

महिला दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित संध्या बापेरकर / उषा कांबळे यांनी एकतर्फी सरळ दोन गेममध्ये मानसी पाटील / संगीता बेंबडे यांना २५-०, २५-४ अशी धुळ चारली. पुरुष दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत मंदार भरताव / गितेश कोरगावकर यांनी महादेव जाविर /  प्रियेश पाठक यांचा ५-२५, २५-१, २५-१ असे नमवले

Web Title: Mandar Bharatkar and Sandhya Baparkar double crown in carrom tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई