मल्ल बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, ऑलिम्पिकआधी भारताला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 05:41 IST2021-06-27T05:40:49+5:302021-06-27T05:41:22+5:30

युरोपियन चॅम्पियनशिपमधील २३ वर्षे गटाचा रौप्य विजेता अबुल माजिद कुदीवयाच्या विरुद्ध सामन्यादरम्यान बजरंगच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली. पहिल्या फेरीत कुदीवने बजरंगचा उजवा पाय अचानक ओढला.

Malla Bajrang Punia injured, pushes India ahead of Olympics | मल्ल बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, ऑलिम्पिकआधी भारताला धक्का

मल्ल बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, ऑलिम्पिकआधी भारताला धक्का

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक आधी भारताच्या पदक मोहिमेला धक्का बसला. मल्ल बजरंग पुनिया रशियातील एका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शुक्रवारी दुखापतग्रस्त झाला.

युरोपियन चॅम्पियनशिपमधील २३ वर्षे गटाचा रौप्य विजेता अबुल माजिद कुदीवयाच्या विरुद्ध सामन्यादरम्यान बजरंगच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली. पहिल्या फेरीत कुदीवने बजरंगचा उजवा पाय अचानक ओढला. यामुळे बजरंगला चालताना त्रास जाणवत होता. त्याने स्पर्धेतून माघार घेतली. जखमेचे स्कॅन करण्यात आले असून सोमवारपर्यंत अहवाल येईल. बजरंग हा मागच्या एक महिन्यापासून रशियात सराव करीत असून ऑलिम्पिकमध्ये पदकाचा दावेदार आहे. या जखमेबाबत भाष्य करणे सध्यातरी अतिघाईचे ठरेल, असे भारतीय कुस्ती महासंघाने म्हटले आहे.

मी ठणठणीत: बजरंग
n दरम्यान, मल्ल बजरंग पुनिया याने मात्र आपण ठणठणीत असून खेळात असे चालत राहते, अशी प्रतिक्रया दिली. जखमेबाबत तो सांगू शकला नाही. त्याच्या निकटवर्तीयांच्या मते तो स्वत: चालू शकतो हे चांगले संकेत आहेत. जखमेचे योग्य आकलन होण्यास किमान दोन दिवस लागणार आहेत.
 

Web Title: Malla Bajrang Punia injured, pushes India ahead of Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.