राज्य खो-खो संघटनेच्या उपाध्यक्षपदी महेश गादेकर
By Admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:50+5:302014-08-22T22:11:50+5:30
सोलापूर :

राज्य खो-खो संघटनेच्या उपाध्यक्षपदी महेश गादेकर
स लापूर : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार तर उपाध्यक्षपदी सोलापूरचे महेश गादेकर यांची निवड करण्यात आली़ संघटनेची चौवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेवढय़ा जागा होत्या तेवढे अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड़ जयंत देशमुख यांनी सांगितल़े याची अधिकृत घोषणा रविवार, दि़ 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार आह़ेनूतन पदाधिकारी असे-अध्यक्ष अजित पवार (पुणे), उपाध्यक्ष महेश गादेकर (सोलापूर), पांडुरंग शिंदे (सातारा), बाळासाहेब जामकर (परभणी), विश्वनाथ गायकवाड (लातूर), कार्याध्यक्ष मंदार देशमुख (नाशिक), खजिनदार तुषार सुर्वे (मुंबई), सरचिटणीस चंद्रजित जाधव, संयुक्त चिटणीस सचिन गोडबोले (पुणे), कमलाकर कोळी (ठाणे), चित्राताई आगळे (बीड), गजानन मगदूम (सांगली), गोविंद शर्मा (औरंगाबाद)़