Bhupathi Birthday: अशी आहे महेश भूपती-लारा दत्ताची लव्हस्टोरी, कशी झाली होती दोघांची भेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:06 IST2018-06-07T15:06:21+5:302018-06-07T15:06:21+5:30

आज याच महेश भूपतीचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता यांची लव्हस्टोरी....

Mahesh Bhupathi Birthday Special : Mahesh Bhupathi and Lara Dutta love story | Bhupathi Birthday: अशी आहे महेश भूपती-लारा दत्ताची लव्हस्टोरी, कशी झाली होती दोघांची भेट?

Bhupathi Birthday: अशी आहे महेश भूपती-लारा दत्ताची लव्हस्टोरी, कशी झाली होती दोघांची भेट?

क्रिकेट वर्ल्ड कप प्रमाणेच टेनिस ग्रॅन्ड स्लॅमचा किताब जिंकणे एक मोठा सन्मान असतो. भारताचा टेनिस खेळाडू महेश भूपतीने 1997 मध्ये जपानी स्टार रिका हिराकीसोबत फ्रेन्च ओपनचा किताब जिंकला होता. टेनिस ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू झाला. आज याच महेश भूपतीचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता यांची लव्हस्टोरी....

अमेरिकेत झालं होतं शिक्षण

महेश भूपतीचा जन्म 7 जून 1974 मध्ये चेन्नईमध्ये झाला होता. त्याचं पूर्ण नाव महेश श्रीनिवास भूपती आहे. सुरुवातीचं शिक्षण चेन्नई आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी तो अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिप्पीला गेला. तेथूनच 21 व्या वर्षी त्याने टेनिसमधील करिअरची सुरुवात केली. 

लिएंडर पेससोबत बनली यशस्वी जोडी

महेश भूपती टेनिस करिअरमध्ये अनेक खेळाडूंसोबत खेळला. पण त्याची पार्टनरशिप सर्वात जास्त गाजली ती लिएंडर पेससोबत. 1999 मध्ये त्यांनी फ्रेन्च ओपन आणि विंम्बल्डनवर नाव कोरलं. महेशने पेससोबतच चारही ग्रॅंड स्लॅमचा प्रवास करत अनोखा रेकॉर्ड केला. हा कारनामा करणारी पुरुष डबल्समधील ही पहिलीच जोडी आहे.

(Image Credit: Rediff)

घटस्फोटानंतर लारा दत्तासोबत लग्न

महेश भूपतीने 2002 मध्ये मॉडल श्वेता जयशंकरसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न केवळ 7 वर्ष टिकलं आणि दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर महेश भूपती हा माजी मिस यूनिव्हर्स लारा दत्ताच्या प्रेमात पडला. पण दोघांनी अनेकवर्ष आपलं नातं लपवून ठेवलं होतं. पुढे 16 फेब्रुवारी 2011 मध्ये भूपतीने मुंबईत लारासोबत लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी असून त्यांनी तिचं नाव सायरा ठेवलं आहे. 

कशी झाली होती दोघांची भेट?

महेश भूपती आणि लारा दत्ता या दोघांची भेट महेशच्या एन्टटेन्मेंट आणि स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीच्या एका बिझनेस मिटींग दरम्यान झाली होती. लारा दत्ताने तिच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचं काम महेशच्या कंपनीला दिलं होतं. या भेटीनंतर लारा आणि महेश डेटिंग करु लागले होते. 

Web Title: Mahesh Bhupathi Birthday Special : Mahesh Bhupathi and Lara Dutta love story