शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या संकर्षाचे विजेतेपद

By admin | Updated: June 6, 2015 01:08 IST

महाराष्ट्राचा ११ वर्षीय संकर्षा शेळके याने शानदार कामगिरीसह बाजी मारताना ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या ‘ब’ विभागाचे विजेतेपद पटकावले.

मुंबई : महाराष्ट्राचा ११ वर्षीय संकर्षा शेळके याने शानदार कामगिरीसह बाजी मारताना ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या ‘ब’ विभागाचे विजेतेपद पटकावले. त्याचसोबत त्याने रोख एक लाख रुपयांच्या बक्षिसावर देखील कब्जा केला. दुसऱ्या बाजूला ग्रँडमास्टर एनग्युएन ड्यूक होआ, झीआॅर रेहमान आणि मार्टिन क्रेवस्टीव यांनी चमकदार विजय नोंदवताना अनुक्रमे ग्रँडमास्टर पंत्सुलेया लेवान, ग्रँडमास्टर अलेक्झांड्रोव्ह अ‍ॅलेक्सेझ आणि पी. कार्तिकेयन या कसलेल्या खेळाडूंना धक्का दिला.गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संकर्षा याने स्पर्धेच्या अंतिम क्षणी आपला खेळ उंचावून गटावर वर्चस्व राखले. त्याचवेळी मध्यप्रदेशच्या अश्विन डॅनिएल आणि महाराष्ट्राच्या सिध्दांत गायकवाड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा केला. स्पर्धेच्या मुख्य फेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालांनी दिवस गाजवला. व्हिएतनामचा ग्रँडमास्टर एनग्युएन याने माजी विजेत्य ग्रँडमास्टर पंत्सुलेया याला अवघ्या २८ चालींमध्ये हार मानण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे काळ्या मोहऱ्यांनी खेळताना एनग्युएनने इंग्लिश सुरुवात करताना पंत्सुलेयावर वर्चस्व राखले. बांगलादेशचा ग्रँडमास्टर रेहमानने देखील लक्ष वेधताना कसलेल्या अलेक्झांड्रोव्हचा पराभव केला. पाचव्या बोर्डवर झालेल्या अन्य एका अटीतटीच्या लढतीत ग्रँडमास्टर क्रेवस्टीव्ह मार्टीनने मार्कोझी बाइंड पध्दतीने खेळताना पी. कार्तिकेयनचा सिसिलियन बचाव भेदला. सुरुवातीला सावध खेळ करताना दोन्ही खेळाडूंनी सामन्यात ४५ व्या चालीपर्यंत बरोबरी राखली होती. यानंतर मात्र क्रेवस्टीव्हने जबरदस्त हल्ला चढवताना कार्तिकेयनला हतबल केले. या अनपेक्षित आक्रमणामुळे कार्तिकेयनची एकाग्रता भंग झाली व त्याने सपशेल हार पत्करली.