शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:54 IST

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने सुवर्ण पदक जिंकले आहे.  

नवी दिल्ली : ८वी  विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा डी बॅरॉन रिसॉर्ट, लंगकावी, मलेशिया येथे ३ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान संपन्न झाली. भारतीय संघाकडून प्रथमच विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील संदीप दिवेने या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या राष्ट्रीय विजेत्या अब्दुल रेहमानला अंतिम सामन्यात अत्यंत अटीतटीच्या लढतीत १-२५, २५-१९ व २५-२२ असे पराभूत करून सुवर्ण पदक पटकाविण्याचा मान मिळविला. यापूर्वी २०१६ मध्ये भारताच्या प्रशांत मोरेने यु. के. येथे असाच विक्रम केला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या के. श्रीनिवासने भारताच्या फार्मात असलेल्या विश्व विजेत्या प्रशांत मोरेवर २५-१२, २५-२० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून कांस्य पदक मिळविले.                    तर महिलांच्या एकेरीत भारताच्या रश्मी कुमारीने अंतिम सामन्यात भारताच्या राष्ट्रीय विजेत्या व महाराष्ट्रातील काजल कुमारीला २५-२०, २५-१६ असे पराभूत करून तिसऱ्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. भारतीय संघाकडून प्रथमच खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या नीलम घोडकेने कांस्य पदक मिळविताना भारताच्याच देबजानी तामूलीला २५-२१, २५-७ असे हरविले.

पुरुष सांघिक गटाने पटकावले सुवर्ण पुरुष सांघिक गटात भारताने श्रीलंकेवर ३-० असा सहज विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताच्या प्रशांत मोरेने माजी विश्व विजेत्या निशांता फेर्नांडोला २५-१५, २५-१४ असे तर भारताच्या के. श्रीनिवासने शाहिद हिलमीला २५-४, २५-९ असे पराभूत केले. दुहेरीत भारताच्या संदीप दिवे व अब्दुल रेहमान जोडीने श्रीलंकेच्या उद्देश परेरा व सुरज फर्नांडो जोडीवर २५-०, २५-१५ असा एकतर्फी विजय मिळविळा. श्रीलंकेने रौप्य पदक मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी मालदीवजने बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. 

भारतीय खेळाडूंनी अमेरिकेला लोळवलंमहिला संघाने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरताना अमेरिकेचा ३-० असा फडशा पाडला. भारताच्या नीलम घोडकेने अमेरिकेच्या पूजा राठीला २५-०, २५-० असे नमविले. तर दुसरीकडे फार्मात असलेल्या रश्मी कुमारीने अमेरिकेच्या प्रिती झकोटियाला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-४, १३-२५ व २५-१४ असे हरविले. दुहेरीत भारताच्या काजल कुमारी व देबजानी तामूली जोडीने अमेरिकेच्या उमा मुनगाला व तेजस्वी दुडुकाला २५-९, २५-० असे हरविले. कॅरमच्या इतिहासात अमेरिकेने प्रथमच रौप्य पदकाची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत श्रीलंकेने बांगलादेशवर ३-० असा सहज विजय मिळवून कांस्य पदक पटकाविले. 

पुरुष दुहेरीत भारताच्या प्रशांत मोरे व अब्दुल रेहमान जोडीने अंतिम सामन्यात भारताच्या के. श्रीनिवास व संदीप दिवे जोडीवर ०-२५, २५-२३ व २५-१५ असा निसटता विजय मिळविला. भारताने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळविले.तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रीलंकेच्या निशांता फर्नांडो व शाहीद हिलमी जोडीने बांगला देशच्या हाफिझूर रेहमान व अब्दुल खलाक जोडीवर १७-२५, २५-०७, २५-१३ असा विजय मिळविला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या रश्मी कुमारी व नीलम घोडके जोडीने भारताच्याच काजल कुमारी व देबजानी तामूलीला २५-८, २५-० असे सहज पराभूत करून विजयावर शिक्कामोर्तब केला. या गटात भारताने सुवर्ण व रौप्य पदक मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अमीनाथ विधाध व ऐशाथ फैनाझ  जोडीने श्रीलंकेच्या रेबेका डार्लिन व मधुवंती जोडीवर ३-२३, २५-४ व २५-२१ अशी निसटती मात केली. 

१८ देशांनी घेतला होता सहभाग स्विस लीग गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील महम्मद घुफ्रानने ८ सामने सलग जिंकत १६ गुण मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर प्रत्येकी १४ गुण मिळविलेल्या यु. ए. इ. चा सुफियान चिकतेने रौप्य पदक तर श्रीलंकेच्या शाहिद हिलमीने कांस्य पदक पटकाविले. यजमान मलेशियासाहित भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदिवज, यु,के. अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड, साऊथ कोरिया, फ्रान्स, यु. ए. ई, सिंगापूर, सर्बिया, कतार, इटली अशा एकूण १८ देशांनी सहभाग या स्पर्धेत भाग घेतला होता.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGold medalसुवर्ण पदकGoldसोनंSilverचांदीMalaysiaमलेशिया