शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाराष्ट्र केसरी 2020 : माती विभागात आबासाहेब आटकळेने जिंकले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 12:58 IST

Maharashtra Kesari 2020 Result : ७९ किलो माती विभागात हणमंत पुरीची सुवर्ण कामगिरी

पुणे : महाराष्ट्र केसरीकुस्ती स्पर्धेतील लढतीना काल दिनांक ३ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. काल सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात ५७ व ७९ किलो वजनी गटातील एकूण पाच फेऱ्या झाल्या. तर माती विभाग मधील अंतिम लढती झाल्या असून गादी विभागाच्या दोन गटातील लढती आज सकाळच्या सत्रात होतील.

५७ किलो वजनी गटातील थरारक लढतीत आबासाहेब अटकळेची बाजी  ५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली. सहा मिनिटाच्या लढतीत दोघांचे ही ८-८ असे बरोबरीत गुण झाले होते. पण आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

७९ किलो माती विभागात हणमंत पुरीची सुवर्ण कामगिरी चार कुस्त्या करून अंतिम फेरीत धडक मारलेल्या पैलवाम हणमंत पुरी (उस्मानाबाद) व पैलवान सागर चौगुले (सोलापूर जिल्हा ) यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सागर वरती ५ विरुद्ध ० अशा  गुण फरकाने विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर कांस्य पदकाच्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात केली.  ७९ किलो गादी विभागाच्या उपांत्य लढतीत रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वर १३ विरुद्ध ४ गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावर ४ विरुद्ध १ अशा गुण फरकाने मात देत अंतिम फेरी गाठली. उद्या, ४ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे. तर ५७ किलो गटात जोतीबा अडकळे याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गादी विभागातील ७९ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने  उस्मानाबादच्या रविंद्र खैरे याचा १४-३ गुणाधिक्याने पराभव करून सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली, तर रविंद्र खैरेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

*७९ किलो अंतिम निकाल*१)  रामचंद्र कांबळे (सोलापूर) २)  रविंद्र खैरे (उस्मानाबाद) ३)  केवल भिंगारे (अहमदनगर) ३)  श्रीधर मुळीक (सातारा)

गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले याला चारीमुंड्या चितपट करून सुवर्ण पदक पटकाविले, तर रमेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर पुणे शहरातील संकेत ठाकुर याने तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या साईराज चौगुले याचा १०-० आशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्य पदक जिंकले. 

*५७ किलो अंतिम निकाल*१)ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा) २) रमेश इंगवले (कोल्हापूर जिल्हा) ३)संकेत ठाकुर (पुणे शहर) ३) अतिष तोडकर (बीड)

■ ७९ किलो  (माती विभाग)

🥇सुवर्ण – हणमंत पुरी (उस्मानाबाद)

🥈रौप्य – सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )

🥉कांस्य – धर्मा शिंदे (नाशिक)

■ ५७ किलो (माती विभाग)

🥇सुवर्ण – आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)

🥈रौप्य – संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)

🥉कांस्य – ओंकार लाड (नाशिक)

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्रOsmanabadउस्मानाबाद