शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशला नमवले

By admin | Updated: January 13, 2016 03:52 IST

गुजरातविरुद्ध झालेल्या पराभवाची कामगिरी मागे टाकून महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ६६व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत दमदार पुनरागमन करताना अरुणाचल प्रदेशचा ७१-२९

मुंबई : गुजरातविरुद्ध झालेल्या पराभवाची कामगिरी मागे टाकून महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ६६व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत दमदार पुनरागमन करताना अरुणाचल प्रदेशचा ७१-२९ असा फडशा पाडला.म्हैसूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील लेव्हल टू गटामध्ये झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करताना पहिल्याच क्वार्टरमध्ये २१-९ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मात्र यानांतर अरुणाचल संघाने १४-९ असे गुण मिळवताना सहजासहजी हार पत्करणार नसल्याचा इशाराच दिला. यावेळी महाराष्ट्राने आपला हिसका दाखवताना तिसऱ्या क्वार्टरमध्ये २६-०, तर चौथ्या क्वार्टमध्ये १५-६ अशी बाजी मारून अरुणाचलच्या पराभवावर शिक्का मारला. उमेश आणि रोहन यांनी प्रत्येकी १३ तसेच अजिंक्य माने याने १२ गुण वसूल करताना महाराष्ट्राच्या विजयात चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या महिलांना मात्र छत्तीसगडविरुध्द ४५ - ७२ अशा पराभवास सामोरे जावे लागले. पुनम चतुर्वेदी (२३), सरणजीत कौर (१७), संगीता कौर (११) यांच्या जोरावर छत्तीसगडने विजयी कूच केली. तर महाराष्ट्रकडून संगीता (१३), शिरीन लिमये (१०) आणि कर्णधार मनीषा डांगे (१०) यांनी अपयशी झुंज दिली.