बार्सिलोनाकडून माद्रिदचा धुव्वा

By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-23T00:31:49+5:302015-11-23T00:31:49+5:30

जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेल्या फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाने रियाल माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडविला.

Madrid's Madrid Fault | बार्सिलोनाकडून माद्रिदचा धुव्वा

बार्सिलोनाकडून माद्रिदचा धुव्वा

माद्रिद : जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेल्या फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाने रियाल माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडविला. लुईस सुआरेझ याने दोन, तर नेमार, आंद्रेज इनिएस्टा यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला शानदार विजयी मिळवून दिला.
एस्टाडियो सॅन्टिगो येथील मैदानावर हा सामना झाला. विशेष म्हणजे पूर्वार्धात स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या शिवायच बार्सिलोनाचा संघ मैदानात उतरला होता. मेस्सी २६ सप्टेंबरपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. त्यामुळे पूर्वार्धात मेस्सी मैदानावर दिसला.
मेस्सीच्या अनुपस्थितीत अव्वल खेळाडू सुआरेझ, नेमार व इनिएस्टा यांनी संघाच्या आक्रमणाची धुरा सांभाळली होती, तर दुसरीकडे दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्या माद्रिद संघाला एकही गोल करता आला नाही.
सामन्याच्या ११ व्या मिनिटास सुआरेझने सर्जी रॉबर्टो याच्या पासवर गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली, तर नेमारने आंद्रेज इनिएस्टा याने दिलेल्या सुरेख पासच्या बळावर चेंडू गोल जाळ्यात धाडत संघाची आघाडी २-०ने वाढविली. उत्तरार्धात इनिएस्टाने (५३ मि.) नेमारच्या पासवर गोल करीत संघाला ३-०ने आघाडीवर नेले, तर सुआरेझने ७४व्या मिनिटाला जॉर्डी अल्बाने दिलेल्या पासवर गोल करीत संघाला ४-० आघाडीसह शानदार विजयी मिळवून दिला. वैयक्तिक गोल करणाऱ्या व एका गोलमध्ये साहाय्य करणारा इनिएस्टा सामन्याचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)

Web Title: Madrid's Madrid Fault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.