माद्रिदने सेल्टा वीगोची घोडदौड रोखली

By Admin | Updated: October 25, 2015 23:51 IST2015-10-25T23:51:28+5:302015-10-25T23:51:28+5:30

रियल माद्रिदने ३-१ विजयासह सेल्टा वीगो संघाला प्रथमच पराभवाची चव चाखायला लावली. त्याचबरोबर ला लीगा फुटबॉल स्पर्धेत त्यांनी अव्वल स्थानी राहताना ३ गुणांची आघाडी घेतली आहे.

Madrid celeste Vigo stallion | माद्रिदने सेल्टा वीगोची घोडदौड रोखली

माद्रिदने सेल्टा वीगोची घोडदौड रोखली

माद्रिद : रियल माद्रिदने ३-१ विजयासह सेल्टा वीगो संघाला प्रथमच पराभवाची चव चाखायला लावली. त्याचबरोबर ला लीगा फुटबॉल स्पर्धेत त्यांनी अव्वल स्थानी राहताना ३ गुणांची आघाडी घेतली आहे. विजयी संघाकडून क्रिस्टियानो रोनाल्डो, डानिलो आणि मार्सेलो यांनी गोल केले.
सेल्टा वीगाकडून एकमेव गोल सामना संपण्याच्या पाच मिनिटे आधी नोलितो याने केला.
गुस्तावो काब्राल याला सामन्यात दुसरे पिवळे कार्ड दाखवून त्याला
बाहेर करण्यात आल्यामुळे सेल्टा
वीगो संघाला उत्तरार्धात १२ मिनिटांनंतर १0 खेळाडूंनिशी खेळावे लागले.
माद्रिदच्या विजयात गोलरक्षक केलोर नवास याचीदेखील भूमिका निर्णायक ठरली. त्याने सेल्टा वीगो संघाचे अनेक हल्ले परतवून लावले. अन्य लढतीत फ्रेंच स्ट्रायकर केवन गेमेईरोच्या हॅट्ट्रिकच्या बळावर सेविला संघाने गेटाफे संघाला ५-0 अशी धूळ चारली. नॉर्थ ईस्ट येथे झालेल्या सुंदरलॅण्ड विरुद्ध न्यूकॅस्टल हा सामना सुंदरलॅण्ड संघाने ३-० गोलने जिंकला.(वृत्तसंस्था)

Web Title: Madrid celeste Vigo stallion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.