टेनिस कोर्टवर ‘लव्ह स्टोरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 04:04 IST2019-09-05T04:04:26+5:302019-09-05T04:04:57+5:30
स्वितोलिना, गेल देतात एकमेकांना प्रोत्साहन

टेनिस कोर्टवर ‘लव्ह स्टोरी’
न्यूयॉर्क : युक्रेनची एलिना स्वितोलिना आणि फ्रान्सचा गेल मोंफिल्स यांच्यात यूएस ओपन स्पर्धेदरम्यान टेनिस कोर्टवर नवी लव्ह स्टोरी फुलताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना प्रेरित करीत असून, अंतिम फेरीकडे वेगवान कूच करीत आहेत.
स्वितोलिनाने जुलैमध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक दिली होती. मंगळवारी येथे उपांत्यपूर्व सामन्यात ब्रिटनची योहाना कोंटा हिच्यावर ६-४,६-४ ने विजय नोंदविला. उपांत्य फेरीत धडक देणारी युक्रेनची ती पहिलीच खेळाडू बनली. तिचा मित्र आणि १३ वा मानांकित मेंफिल्सने देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची गाठ इटलीचा माटियो बेरेटिनीविरुद्ध पडणार आहे. २४ वर्षांच्या स्वितोलिनाने आम्ही एकमेकांचा उत्साह वाढवित आहोत, अशी कबुली दिली. यंदाच्या आॅस्ट्रेलियन ओपनदरम्यान आपल्या नात्यांची जाहीर कबुली देणाऱ्या या जोडीचे इन्स्टाग्रामवर एक लाख फॉलोअर्स आहेत. स्वितोलिनाने आपल्या खेळात सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय मोंफिल्सला दिले.