प्रीतीने पंजाब संघाची भागीदारी विकण्याचे वृत्त फेटाळले
By Admin | Updated: June 20, 2014 01:28 IST2014-06-20T01:28:46+5:302014-06-20T01:28:46+5:30
अभिनेत्री प्रीती ङिांटाने आयपीएल फ्रॅन्चायझी किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील आपली भागीदारी विकण्यास नकार दिला आहे.

प्रीतीने पंजाब संघाची भागीदारी विकण्याचे वृत्त फेटाळले
>नवी दिल्ली : पूर्वीचा प्रियकर व उद्योगपती नेस वाडियाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणारी अभिनेत्री प्रीती ङिांटाने आयपीएल फ्रॅन्चायझी किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील आपली भागीदारी विकण्यास नकार दिला आहे. अमेरिकेत स्थायिक होण्याचे वृत्त प्रीतीने फेटाळले आहे.
प्रीतीने बुधवारी रात्री टि¦टरवर स्पष्ट केले, ‘सर्वानी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. प्रसारमाध्यमातील वृत्ताचे आश्चर्य वाटले. मी संघातील माझी भागीदारी विकणार नसून, अमेरिकेत स्थायिक होण्याचे वृत्तही निराधार आहे.’ कथित सूत्र काहीही बरळतात आणि त्याची बातमी होते. भारतात अनेक मुद्दे आहेत, ज्यावर बातम्या होऊ शकतात, असेही प्रीती म्हणाली. 3क् मे रोजी चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघांदरम्यान वानखेडेवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत प्रीतीने 12 जूनला पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. प्रीती व नेस यांचे 5 वर्षे जुने संबंध 2 वर्षापूर्वी संपुष्टात आले, पण ते अद्याप बिझनेस पार्टनर आहेत, हे विशेष. (वृत्तसंस्था)