शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे फलंदाज गमावल्यामुळे पुनरागमन करणे कठीण होते

By admin | Updated: April 14, 2015 00:57 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला.

मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला. मुंबई इंडियन्सचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे सामन्यात पुनरागमन करणे कठीण होेते, अशी प्रतिक्रिया हरभजनने व्यक्त केली. हरभजनने सुरुवातीला गोलंदाजीमध्ये छाप सोडताना ४ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत ६४ धावा फटकावल्या. त्यात ६ षटकारांचा समावेश आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हरभजन म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला अधिक फलंदाज गमावले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. सुरुवातीला भागीदारी झाली असती आमचा डाव सावरला गेला असता, पण असे घडले नाही. त्याचे श्रेय पंजाब संघाच्या गोलंदाजांना मिळायलाच हवे. त्यांनी नव्या चेंडूने चांगला मारा केला. ४ बाद २५ आणि त्यानंतर ५ बाद ४६ अशी अवस्था असताना पुनरागमन करणे कठीण होते. आमच्यासाठी ही लढत चांगली ठरली नाही, पण अखेर लक्ष्याच्या समीप जाण्यास यशस्वी ठरल्यामुळे समाधान वाटले. त्यामुळे यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतींसाठी आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.’’ हरभजन म्हणाला, ‘‘आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. रोहित लवकर बाद झाल्यामुळे संघाला धक्का बसला. कोरी अँडरसन व किरोन पोलार्ड संघात असले, तरी रोहितकडून संघाला मोठ्या खेळीची गरज होती. (वृत्तसंस्था)मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी करणे आवश्यक असते. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत आम्ही अधिक धावा बहाल केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय यांनी सुरुवातीला वेगाने धावा फटकावल्या. पंजाब संघाने पहिल्या पाच षटकांत जवळजवळ अर्धशतकाची मजल मारली होती. त्यानंतर आम्ही पंजाब संघाच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. या खेळपट्टीवर १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य होते. रोहित शर्मा सुरुवातीलाच बाद झाल्यामुळे संघ अडचणीत आला.- हरभजन सिंग