शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन

By admin | Published: September 01, 2014 1:48 AM

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज चीनचा लोंग चेन आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले.

कोपेनहेगन : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज चीनचा लोंग चेन आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले.लोंग चेन याने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा मलेशियाचा खेळाडू ली चोंग वेई याचा कडवा प्रतिकार २१-१९, २१-१९ने मोडून काढला. स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या चेनने ही अटीतटीची लढत १ तास ९ मिनिटांत जिंकून प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याआधी कारकिर्दीत ली चोंग वेईविरुद्ध चेन ८-९ असा माघारलेला होता. आजची प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकून या चिनी खेळाडूने लीसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध ९-९ अशी बरोबरी साधली आहे.महिला एकेरीमध्येने कारकीर्दीतील संस्मरणीय कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या जुईरुई लीची झुंज तीन गेम्समध्ये मोडून काढताना महिला एकेरीत जेतेपदाचा मान मिळविला. नववे मानांकन प्राप्त मारिनने एक तास १८ मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत जुईरईचा १७-२१, २१-१७, २१-१८ ने पराभव करीत प्रथमच विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला. मारिनने उपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूचा पराभव केला होता. मारिनला यापूर्वी जुईरईविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन्ही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पहिला गेम १७-२१ ने गमाविल्यानंतर स्पेनची खेळाडू पुनरागमन करेल, अशी कुणाला अपेक्षा नव्हती, पण मारिनने सर्व शक्यता फेटाळून लावताना दुसरा गेम २१-१७ ने जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मारिनने २१-१८ ने बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. (वृत्तसंस्था)