लोकमत एनपीएल क्रिकेट-४
By Admin | Updated: January 23, 2016 00:14 IST2016-01-22T23:50:10+5:302016-01-23T00:14:52+5:30
क्रिकेट महोत्सवाला मान्यवरांची हजेरी

लोकमत एनपीएल क्रिकेट-४
क्रिकेट महोत्सवाला मान्यवरांची हजेरी
नाशिक : लोकमत एनपीएल क्रिकेट महोत्सवातील सामने बघण्यासाठी शुक्रवारी शहरातील विविध क्रीडा व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. शुक्रवारी दुपारी झालेला सामना बघण्यासाठी नाशिक जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष आनंद खरे, नुकतीच ८१ किलोमीटर जलतरण स्पर्धा जिंकून आलेला जलतरणपटू सौरभ हरी सोनकांबळे, टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू एअरफोर्सचे किरण घोडेराव, नाशिकरोड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक हरी सोनकांबळे, नगरसेवक शैलेश ढगे, डॉ. समीर लासुरे, वास्तुविशारद सुरेश सबनीस, डॉ. श्याम पाटील, मनीष सरकार, रणजीत नायर, नंदकिशोर साळवे, संतोष जोपूळकर, संतोष दिंडे, ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण मंडळाचे राजेंद्र निकम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव नंदलाल धांडे, व्यंकटेश गृहनिर्माण संस्थेचे संचालक अविनाश गोठी, सुरेश लासुरे, भदाणेज् हायटेक कॉम्प्युटरचे निवृत्ती भदाणे, रघुभाई जोशी, गोविंद चव्हाण, नितीन जाधव, संजय ताटे, हेमंत चव्हाण, ज्ञानेश बोराडे आदि मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. (प्रतिनिधी)