लोकमंगल लॉर्ड्स विजयी
By Admin | Updated: August 27, 2014 23:46 IST2014-08-27T23:46:22+5:302014-08-27T23:46:22+5:30
वडाळा:

लोकमंगल लॉर्ड्स विजयी
व ाळा: वडाळा येथे आयोजित लोकमंगल कॉलेजेस लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये लोकमंगल लॉर्ड्सने लोकमंगल बँकेवर एका गुणाने मात करीत विजय नोंदवला़ तसेच लोकमंगल प्रिंट अँड पॅकने लोकमंगल माऊली लोहारावर दोन गुणांनी मात केली़ लोकमंगल अँग्रो दारफळने लोकमंगल लॉजिस्टिकवर आठ गुणांनी विजय मिळवला़ लोकमंगल भंडारकवठे साखर कारखान्याने लोकमंगल लॉर्ड्सवर तीन गुणांनी मात केली़क्रिकेट स्पर्धेत लोकमंगल माऊली लोहाराने लोकमंगल लॉजिस्टिकवर 20 धावांनी मात केली़प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन लोकमंगह समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाल़े या स्पर्धेत लोकमंगल समूहांतर्गत 6 विभागातील 325 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आह़े यावेळी र्शीराम प्रतिष्ठानच्या सचिव अनिता ढोबळे, इंद्रजित पवार, संचालक अविनाश महागावकर, रविकांत पाटील, दिनकर देशमुख, सुरेश साठे, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी साबळे, परदेशी, प्राचार्य सतीश कारंडे, धनंजय शिंदे, शौनक माने, पांडुरंग शेणमारे, श्याम गोवर्धन आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक विनायक सुतार तर सूत्रसंचालन सीमा पाटील यांनी केल़ेफोटोओळी-लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी इंद्रजित पवार, सुभाष देशमुख, परदेशी, दिनकर देशमुख, साबळे, सुरेश साठे, शौनक माने, गणेश मुरगुडे, धनंजय शिंदे, सतीश करंडे, विनायक सुतार आदी़