लोकमत समूहातर्फे रविवारी होणार स्थानिक राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
By Admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:17+5:302014-08-22T23:32:17+5:30
औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे राष्ट्रीय पातळीवर विशेष ठसा उमटवणार्या खेळाडूंचा रविवारी सत्कार होणार आहे.

लोकमत समूहातर्फे रविवारी होणार स्थानिक राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
औ ंगाबाद : लोकमत समूहातर्फे राष्ट्रीय पातळीवर विशेष ठसा उमटवणार्या खेळाडूंचा रविवारी सत्कार होणार आहे.ज्या खेळाडूंनी एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ दरम्यान खुल्या आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, अशा खेळाडूंचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे. आतापर्यंत १00 पेक्षा जास्त खेळाडूंनी सत्कार सोहळा कार्यक्रमास नोंदणी केली आहे. समिती सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड करणार आहे.या सत्कार सोहहळ्यासाठी राष्ट्रीय खेळाडूंनी त्यांच्या सहभाग प्रमाणपत्रासह शनिवारी दुपारी ३ आधी कमांडर विनोद नरवडे, आयसीएफ ऑफिस, पैठणगेट (मो. क्र. ९४२२२१४८५१), मकरंद जोशी एमएसएम महाविद्यालय, खडकेश्वर, (मो. क्र.९४२२७११४३३), विवेक येवले, नरेंद्र स्पोर्ट्स, कॅनॉट प्लेस (मो. क्र. ९८२३२६0७0७) येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी गोविंद शर्मा (९४२२२९४१७६), जसप्रीतसिंग भाटिया (९८९0३३११0१) आणि अभय देशमुख (९८५00३६३६३) यांच्याशी संपर्क साधावा. (क्रीडा प्रतिनिधी)