लिओनेल मेस्सीचा "शूटआऊट", बालमैत्रीणीसोबत अडकला विवाहबंधनात

By Admin | Updated: July 1, 2017 09:00 IST2017-07-01T09:00:46+5:302017-07-01T09:00:46+5:30

बार्सिलोना एफसीचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकला आहे

Lionel Messi's "Shootout", Stylish Marriage with Balmatriyani | लिओनेल मेस्सीचा "शूटआऊट", बालमैत्रीणीसोबत अडकला विवाहबंधनात

लिओनेल मेस्सीचा "शूटआऊट", बालमैत्रीणीसोबत अडकला विवाहबंधनात

>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 1 - बार्सिलोना एफसीचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकला आहे. मेस्सी आपली बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून क्रीडाविश्वात मोठी चर्चा होती. हे लग्न म्हणजे वेडिंग ऑफ द सेंच्यूरी म्हणलं जात होतं. या लग्नसोहळ्यासाठी क्रीडा आणि सिनेमा जगतातील तारे एकत्र आले होते. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. 
 
या लग्नासाठी एकूण 250 पाहुणे आमंत्रित होते. पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक यांचाही पाहुण्यांच्या यादीत समावेश होता. दोघे कदाचित लग्नाला येणार नाहीत असं वृत्त याआधी मिळत होतं. मात्र दोघांनीही लग्नाला हजेरी लावली. लग्नासाठी क्रिडाविश्वातील अनेक स्टार खेळाहूडी आवर्जून उपस्थित होते.
 
या लग्नासाठी मोठी सुरक्षा पुरवण्यात आली होती. 400 पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. अँटोनेला रिकुज्जोने रोसा क्लाराने डिझाईन केलेला  ड्रेस घातला होता. पाहुण्यांसाठी कॉम्प्लेक्समधील पुलमन हॉटेलमध्ये 188 रुम बूक करण्यता आल्या होत्या. लग्नाच्या निमित्ताने संपुर्ण परिसर पाहुण्यांनी गजबजला असल्याने सामान्यांसाठी रहदारी बंद करण्यात आली होती. 
 

Web Title: Lionel Messi's "Shootout", Stylish Marriage with Balmatriyani