शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:53 IST

लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणाºया राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणाºया लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आता ही महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीस होईल.‘लोकमत’तर्फे आतापर्यंत नाशिक व औरंगाबादला महामॅरेथॉन झाली. नागपूरला ११ फेब्रुवारीस होणार आहे. तत्पूर्वी ही महामॅरेथॉन कोल्हापुरात २८ जानेवारीस सकाळी सहा वाजता होणार होती. ३, ५, १० व २१ किलोमीटर गटांत ही मॅरेथॉन होणार असून, त्याची जय्यत तयारीही पूर्ण झाली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसासह पदक दिली जातील. ही मॅरेथॉन पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होऊन कावळा नाका, विद्यापीठ, शाहू नाका व तेथून परत त्याचमार्गे पोलीस परेड ग्राऊंडवर समाप्त होणार होती.दरम्यान, लिंगायत धर्माला संविधानिक ‘स्वतंत्र धर्म’ मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा व जनगणना अर्जात लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे २८ जानेवारीलाच येथील दसरा चौकातून सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मुख्यत: महाराष्ट्रातून व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव येणार आहेत; परंतु महामॅरेथॉनसाठी सकाळी सहा वाजल्यापासून मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे लिंगायत बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी मॅरेथॉन पुढे ढकलावी, अशी विनंती लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाकडे केली. त्या समाजाच्या भावनांची दखल घेऊन ‘लोकमत’ने महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.कोल्हापुरातील महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला होणार असल्याने खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी व पोषक वातावरण उपलब्ध होईल. महामोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय धावपटूंच्या हिताचाच असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रातून व्यक्त होत आहे.‘लोकमत’ने जपलीसामाजिक बांधिलकी...‘लोकमत’ने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली असून समाजहितांच्या उपक्रमांना भरभरुन पाठिंबा दिला आहे. लिंगायत बांधवांच्या मोर्चाप्रती भावना लक्षात घेऊन ‘महामॅरेथॉन’चे आयोजन पुढे ढकलले. मोर्चात सहभागी होणाºया बांधवांचे हित जोपासल्याबद्दल ‘लोकमत’च्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन