‘ली ना’चा निरोप !
By Admin | Updated: September 20, 2014 01:57 IST2014-09-20T01:57:13+5:302014-09-20T01:57:13+5:30
चीनची दोनवेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती ली ना हिने अखेर आपल्या टेनिस कारकिर्दीला ‘रामराम’ ठोकला. दुखापतीच्या कारणाने आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा तिने शुक्रवारी केली.

‘ली ना’चा निरोप !
बीजिंग : चीनची दोनवेळची ग्रॅण्डस्लॅम विजेती ली ना हिने अखेर आपल्या टेनिस कारकिर्दीला ‘रामराम’ ठोकला. दुखापतीच्या कारणाने आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा तिने शुक्रवारी केली.32 वर्षीय ली म्हणाली, हे वर्ष माङयासाठी खूप कठीण राहिले. अनेक समस्यांचा सामना केला. अखेर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहे, असे सांगताच तिचे डोळे पाणावले. ली ना ही जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर आहे. तिने 2क्11मध्ये फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती.
त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती जुलैनंतर उर्वरित सत्रत खेळू शकली नाही. ‘निवृत्तीची हीच योग्य वेळ असून, एक व्यावसायिक खेळाडू म्हणून हा निर्णय घेणो योग्य वाटते. गुडघ्यावरील चार शस्त्रक्रिया आणि सूज तसेच वेदना कमी होण्यासाठी शंभरहून अधिक इंजेक्शन घेऊनही शरीर खेळण्यासाठी परवानगी देत नाही आहे, त्यामुळे येथेच थांबणो योग्य वाटते. हा निर्णय खूप कठीण आहे’, असेही तिने सांगितले.