लक्ष्मण फलंदाजीच्या सल्लागारपदी नियुक्त
By Admin | Updated: October 25, 2014 22:50 IST2014-10-25T22:50:01+5:302014-10-25T22:50:01+5:30
कोलकाता:

लक्ष्मण फलंदाजीच्या सल्लागारपदी नियुक्त
क लकाता: बंगाल क्रिकेट संघ (सीएबी) ने राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचविण्याची आपली व्हिजन-2020 परियोजनेंतर्गत माजी फलंदाज व्ही़व्ही़एस़ लक्ष्मणची फलंदाजीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आह़े लक्ष्मणने सांगितले की, पुढील एका वर्षात 30 दिवसांसाठी येथे येऊन राज्यातील युवा खेळाडूंसोबत मेहनत घेईऩ सीएबीचे संयुक्त सचिव सौरव गांगुलीमुळे आपण बंगालसोबत जोडल्याचे त्याने सांगितल़े सीएबीने लक्ष्मणव्यतिरिक्त र्शीलंकेचा स्पिनर मुथय्या मुरलीधरनला बंगालच्या स्पिन गोलंदाजीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आह़े