लॅथमने केली टेलरची पाठराखण
By Admin | Updated: October 25, 2016 19:38 IST2016-10-25T19:38:09+5:302016-10-25T19:38:09+5:30
भारत दौ-यात निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या रॉस टेलरची न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने पाठराखण केली.

लॅथमने केली टेलरची पाठराखण
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 25 - भारत दौ-यात निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या रॉस टेलरची न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने पाठराखण केली. माजी कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमनेही टेलरवर टीका केली होती. मॅक्युलमने आपल्या आत्मचरित्रात ‘डिक्लेयर्ड’मध्ये कर्णधारपदादरम्यान टेलर खेळाडूंना प्रेरित करत नव्हता. खेळाडूंसोबत संवाद साधण्यात तो अपयशी ठरला, अशी टीका केली आहे.
याबाबत बोलताना लॅथम म्हणाला,‘तसा मला कधी अनुभव आला नाही. टेलर या दौºयात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.’ त्याने मोहालीमध्ये गेल्या लढतीत ४४ धावा केल्या होत्या. लॅथमला अखेरच्या दोन लढतीत टेलरकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
लॅथम म्हणाला,‘टेलर अनुभवी आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे तर काही खेळाडूंना विशेष अनुभव नाही. आम्ही सर्वोत्तम खेळ केला तर निश्चितच यश मिळेल. टेलरने गेल्या लढतीत खेळपट्टीवर काही वेळ घालविला असून त्याला सूर गवसल्याचे संकेत मिळाले आहे.’